ब्रेकअपचा राग आल्याने प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो ठेवला स्टेटसला
पुण्यातील धक्कादायक प्रकार, प्रेमसंबंध तोडल्याने प्रेयसीचा छळ
पुणे दि ९(प्रतिनिधी)- ब्रेकअप झाल्यानंतर प्रियकराने प्रेयसीचा नग्न फोटो व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात घडला आहे. त्यासोबतच प्रेमसंबंध तोडल्याने प्रियकराने प्रेयसीचा छळ सुरू केला. या त्रासाला कंटाळून तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पुणे जिल्ह्यातील शिरूरमधील एका तरुणाच्या विरोधात कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेंद्र धरमचंद फुलपगार असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि फुलफगर यांच्यात गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची माहिती आहे. त्यांच्यात वाद झाल्याने तरुणीने फुलफगर याच्यासोबतचे प्रेमसंबंध तोडले. ब्रेकअप झाल्यानंतर आरोपी तरुणीला त्रास देऊ लागला. त्यामुळे या प्रकरणाची तक्रार तरुणीने मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात दिली. या प्रकरणी आरोपी असलेल्या देवेंद्रवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण देवेंद्रने पोलिसांत दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी तरुणीमागे तगादा लावला होता. गुन्हा मागे न घेतल्याने आरोपीने त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर तरुणीचा विवस्त्रावस्थेतील फोटो ठेवून ‘ये तो शुरुआत है’ असे स्टेटस ठेवले होते.
एक डिसेंबरला घडलेला हा प्रकार तरुणीच्या लक्षात आल्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. सध्या सोशल मीडियावरुन होणाऱ्या गुन्ह्यांचं प्रमाण सातत्याने वाढत आहे. सध्या आजूबाजूला असलेलं प्रत्येक गोष्टीत तुलनात्मक वातावरण हे या गुन्ह्यांसाठी कारणीभूत ठरत आहे. अनेक मुलांवर सोशल मीडियामुळे प्रभाव पडला आहे.