Latest Marathi News

लग्नाच्या वरातीत नवरदेवाचा बंदुकीतून हवेत गोळीबार

गोळीबाराचा व्हिडिओ व्हायरल, पोलीसांकडून नवरदेवावर कारवाईचा बडगा

कोल्हापूर दि २०(प्रतिनिधी)- कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सडोली या ठिकाणी एका वरातीत नवरदेवाने चक्क बारा बोअरच्या बंदुकीने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. पण अतिउत्साहाच्या भरात गोळीबार करणे या नवरदेवाला चांगलेच भोवले आहे. या गोळीबार प्रकरणी नवरदेव अजयकुमार पवार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

अजयकुमार अशोक पवार असं गोळीबार करणाऱ्या नवरदेवाचे नाव आहे. १४ डिसेंबरला अजयकुमार याचा विवाह संपन्न झाला. यानंतर रात्री लग्नाच्या वरातीमध्ये अजयकुमार याने परवाना असलेल्या आपल्या बारा बोअरच्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला.नवरदेव हवेत गोळीबार करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर करवीर पोलिसांनी अजयकुमार पवार याच्यावर शस्त्र हाताळण्याच्या नियमांचा भंग केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान ब्लॅंक काडतुसामधील छरे आणि दारू काढली जाते. ब्लॅंक काडतूस हे बंदूकीची चाचणी घेण्यासाठी वापरली जाते. या काडतुसाचा धोका नसतो असे बंदुक तज्ज्ञांनी सांगितले. तरीही गर्दीच्या ठिकाणी हवेतून गोळीबार केल्याचे समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पण घटना घडून पाच दिवस उलटून गेले मात्र अद्याप अजयकुमार पवार याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा उगारणारे पोलीस प्रशासन याप्रकरणी गप्प का असा प्रश्न आता सर्वसामान्य उपस्थित करत आहेत.

 

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. हा दिवस आणखी खास बनावा यासाठी नवरी आणि नवरदेव काहीतरी खास आणि हटके करण्याच्या प्रयत्नात असतात. पण असे करणे या नवरदेवाला मात्र चांगलेच महागात पडले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!