
या राज्याचे मुख्यमंत्री ठरले सर्वाधिक काळ पद भूषवणारे दुसरे मुख्यमंत्री
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम यांच्या नावावर, कमी काळ मुख्यमंत्री यादी समोर, महाराष्ट्रातील यांचा समावेश
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- आजचे राजकारण अधिक गतीमान आणि अस्थिर बनले आहे. आजचे सरकार उद्या असेल की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. पण या गदारोळात ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी एक अनोखा विक्रम केला आहे. पटनायक यांनी २३ जुलै रोजी २३ वर्षे आणि १३९ दिवसांच्या कार्यकाळासह भारतातील एका राज्याचे सर्वात जास्त काळ काम करणारे दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत.
ओडीसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईन यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांचा विक्रम मोडला आहे. देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहण्याचा मान सिक्कीमच्या पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर आहे. त्यांनी डिसेंबर १९९४ ते मे २०१९ दरम्यान सर्वाधिक २४ वर्षे आणि १६६ दिवस राज्याचे नेतृत्व करण्याचा विक्रम केला आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ज्योती बसू यांनी २००० मध्ये २३ वर्ष राज्य केल्यानंतर पद सोडले होते. विजू पटनाईक यांनी २००० साली पहिल्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. नवीन पटनायक २०००, २००४, २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये सतत मुख्यमंत्री झाले आहेत. नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बीजेडी सरकारने २०२४ च्या निवडणुका जिंकून राज्यात पुन्हा सरकार स्थापन केले तर त्यांना सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा मान मिळेल. तर सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भुषवण्याचा मान उत्तर प्रदेशच्या जगदंबिका पाल यांच्या नावावर आहे. जगदंबिका पाल यांनी केवळ एक दिवस मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ सांभाळला आहे.
सर्वाधिक काळ मुख्यमंत्री भुषवणारे नेते
१) पी के चामलिंग सिक्कीम २४.५ वर्ष
२) नवीन पटनाईक ओडीसा २३ वर्षे आणि १३९
३) ज्योती बसू प. बंगाल २३ वर्ष १३८ दिवस
४)गेगान अपांग अरुणाचल प्रदेश २२ वर्ष २५० वर्ष
५) पु.ललथनहवाला मिझोरम २२ वर्ष ६० दिवस
६) विरभद्र सिंह हिमाचल प्रदेश २१ वर्ष, १३ दिवस
७) माणिक सरकार त्रिपुरा १९ वर्ष ३६३ दिवस
८) एम करुणानिधी तमिळनाडू १८ वर्ष ३६२ दिवस
९)प्रकासिंह बादल पंजाब १८ वर्ष ३५० दिवस
१०) यशवंत सिंह परमार हिमाचल प्रदेश १८ वर्ष ८३ दिवस
३६) वसंतराव नाईक महाराष्ट्र ११ वर्ष ७८ दिवस
सर्वात कमी कालावधीसाठी झालेले मुख्यमंत्री
१)जगदंबिका पाल उत्तर प्रदेश १ दिवस
२)बी.एस. येडियुरप्पा कर्नाटक अडीच दिवस
३)देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र साडेतीन दिवस
४) सतीश प्रसाद सिंह बिहार पाच दिवस
५)एस.सी. मारक मेघालय. ६ दिवस
७)शिबू सोरेन झारखंड. १० दिवस
८)जानकी रामचंद्रन तमिळनाडू २४ दिवस
९)बी.पी. मंडल बिहार ३१ दिवस
१०)सी.एच. मोहम्मद केरळ ४५ दिवस