Latest Marathi News
Ganesh J GIF

मुलाने जन्मदात्या बापाचा मामाच्या मदतीने काढला काटा

सोलापुरातील हत्याकांडाचा पोलीसांनी 'असा' केला तपास

सोलापूर दि १६ (प्रतिनिधी)- सोलापुरात एका व्यक्तीने घरातील किरकोळ वादातून आपल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार केला. या गोष्टीचा राग आल्याने त्या व्यक्तीचा मुलगा आणि मेहुण्याने धक्कादायक कृत्य केलं.बाप आईला दारू पिऊन मारहाण करतो म्हणून मुलाने वडिलांना नारळाच्या झाडाला बांधून मारहाण केली. यात त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. अखेर पोलीसांनी आरोपींना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जवळील अंत्रोळी येथे शिवाजी थोरात यांनी आपल्या बायकोला घरगुती भांडणाच्या रागातून कुर्‍हाडीने मारहाण केली होती. थोरातच्या दारु पिण्यामुळे घरात सतत वाद होत असत त्यामुळे त्यांचा मुलगा तानाजी शिवाजी थोरात याने वडिलांना झाडाला बांधून क जबर मारहाण केली. तसेच बहिणीला मारल्याचा राग मनात धरुन शिवाजी थोरात यांचा मेहुणा भीमराव जाधव यानेही थोरातला बेदम मारहाण केली यातच त्याचा मृत्यू झाला. पण पोलिसांना कळू नये म्हणून त्याच्या मृत्यूनंतर त्याला घरी आणून पलंगावर झोपवले. त्यांनतर पोलिसांना दुचाकीवरून पडून वडिलांचा मृत्यू झाल्याची फिर्याद मुलाने दिली. मात्र पोलीस तपासात थोरात यांचा मृत्यू जबर मारहाण केल्याने निष्पन्न झाले. त्यानंतर मुलगा आणि मेहुणाविरोधात मंद्रूप पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!