Latest Marathi News
Ganesh J GIF

डिझायनरने या प्रसिद्ध अभिनेत्रीवर केला चोरीचा आरोप

गुन्हा दाखल झाल्यास अभिनेत्रीच्या अडचणी वाढण्याची शक्यता, अभिनेत्री अगोदरही चर्चेत

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- चंदेरी दुनिया बाॅलीवूडमध्ये अनेक अनपेक्षित घटना घडत असतात. आता टीव्हीचा लोकप्रिय शो ‘बिग बॉस १६’ फेम प्रियंका चहर चौधरी सध्या अडचणींनी घेरलेली दिसत आहे. प्रियांकावर कपडे चोरण्याचा आणि कपड्यांची स्टाईल कॉपी केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. प्रसिद्ध फॅशन डिझाईनर इशिताने तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

प्रियंका चहर चौधरीने काही दिवसांपूर्वी तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर बेज रंगाचा रफल लेहेंगा परिधान केलेले काही फोटो शेअर केले होते. यानंतर इशिताने दावा केला होता की हे तिच्या ब्रँडचे कपडे असून, जे तिने खास डिझाइन केले होते. यानंतर इशिताने एकामागून एक ट्विट करत प्रियंका चहरवर आरोप केले आहेत. इशिता परदेशात स्थायिक असलेली फॅशन स्टायलिस्ट आणि डिझायनर आहे. इशिताने डिलीट केलेल्या ट्विटमध्ये लिहिलेलं कि, ‘सायकॉटिक पीआर टीम असलेली ऑब्सेस्ड महिला जी इतरांना त्रास देणे थांबवू शकत नाही. ती विषारीपणाची व्याख्या आहे. तिने इतरांना प्रभावित करण्यासाठी बनावट पर्सनॅलिटी तयार केली आहे. तिला वाटतं की माझ्यासारखं दिसण्याचा प्रयत्न करून किंवा माझ्या क्लोनसारखे कपडे घालून ती माझ्यासारखी बनू शकते. होय, कदाचित एक अब्ज पुनर्जन्मानंतर. माझे ३० हजार पौंड किमतीचे कपडे तिने चोरले. मी काहीच बोलले नाही असा आरोप केला आहे. दरम्यान, इशिताने आपण परदेशात असल्याने प्रियांकाविरोधात तक्रार करू शकले नाही पण भारतात परतल्यावर करेन असे म्हटले आहे. दरम्यान बिग बॉस हिंदी सीजन १६’ फेम अभिनेत्री प्रियंका चहर चौधरी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. विविध फोटो शेअर करून ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. पण त्यामुळेच ती सध्या अडचणीत सापडली आहे.

प्रियंका बिग बॉसच्या शोमध्ये ती नेहमीच आपले मुद्दे ठामपणे मांडायची त्यामुळे ती सर्वांची चाहती होती. मात्र आता तिच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अभिनेत्री इशिता गुप्ताने प्रियंका चहरला धमकी दिली आहे. पण यावर प्रियंका चहर चौधरी यांचे कोणतेही वक्तव्य समोर आलेले नाही.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!