
मविआची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री
ठाकरे गटाचा राष्ट्रवादीला मोठा प्रस्ताव, ठाकरेंच्या प्रस्तावामुळे भाजपाची कोंडी
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. एकीकडे अजित पवार भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु आहेत. पण आता ठाकरे गटाच्या प्रस्तावामुळे पुन्हा अजित पवार चर्चेत आले आहेत. पण त्यामुळे भाजपाच्या अडचणी वाटणार आहेत.
महाविकास आघाडी एकत्र बांधून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने पुढाकार घेतल्याची माहीती आहे. आगामी निवडणुकांत मविआची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला म्हणजेच अजित पवार यांना मुख्यमंत्री देण्यात येईल असा प्रस्ताव ठाकरे गटाने राष्ट्रवादीला दिला आहे. शिंदे गटाचे आमदार अपात्र झाल्यास अजित पवार भाजपमध्ये जाणार आणि सरकारमध्ये सामील होणार अशा चर्चा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यात भर म्हणजे अजित पवारांनी मला आत्ता पण मुख्यमंत्री व्हायला आवडेल असं म्हंटलं होते. त्यामुळे चर्चाना आणखी उधाण आलं होते. दुसरीकडे शरद पवार यांनी सुद्धा मविआच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार वक्तव्य करत मोठी खळबळ उडवून दिली. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना मोठा प्रस्ताव दिला आहे. महाविकास आघाडीमध्ये कोणाला जागा कितीही आल्या तरी मुख्यमंत्री राष्ट्रवादीचा होईल, असे आश्वासन ठाकरेंनी पवारांना दिल्याच्या चर्चा सुरु आहेत. केंद्रात आणि राज्यात सत्तारूढ असलेल्या भाजपविरोधात राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट यांची महाविकास आघाडी वज्रमुठ सभांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करत आहे. तिघे एकत्र आल्यास महाविकास आघाडीची सत्ता येण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाविकास आघाडी एकत्र ठेवण्याचा ठाकरे गटाचा प्रयत्न आहे. सध्या तरी उद्धव ठाकरे यांच्याकडे महाविकास आघाडीचे नेतृत्व आहे. परंतु महाविकास आघाडीचा नेता, नेतृत्व कोणीही करत असो, मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे असेल.अजित पवार मुख्यमंत्री झाले तरी हरकत नाही असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना दिला आहे.
अजित पवार आणि राष्ट्रवादी मविआतून बाहेर पडली तर सगळं भाजपला अनुकूल होईल. त्यामुळेच ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या भविष्याच्या दृष्टीने राष्ट्रवादीला झुकते माप दिले आहे. पण त्यामुळे भाजपाला आगामी निवडणूकीत धक्का बसू शकतो तर दुसरीकडे काँग्रेसने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.