शेतकऱ्यांकडे कर्मचाऱ्याने केली लाचेची मागणी
शेतकरी पुत्राने जे केले ते पाहुन चकित व्हाल, व्हिडिओ व्हायरल
हिंगोली दि २०(प्रतिनिधी)- हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील दाती गावातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणीच्या नोटीसबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला लाच मागितल्यानंतर अधिकाऱ्याला इंग्रजीत कापले. यानंतर कार्यालयात एकच भंबेरी उडाली. यामुळे अभिलेख कार्यालयातील अनागोंदी समोर आली आहे.
कळमनुरी तालुक्यातील दाती गावाचे शेतकरी दत्तराव लक्ष्मण कदम आषि त्यांचा मुलगा प्रमोद कदम हे भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजमाप नोटीसची माहिती घेण्यासाठी गेले होते. पण कार्यालयातील कर्मचारी सय्यदने मोजमापाची नोटीस दाखवण्यासाठी एक हजार रुपये मागितल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे. यावेळी कर्मचाऱ्याला शेतक-याच्या मुलाने इंग्रजीत चांगलेच झापले आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्याने तुमची नोटीस पोस्टाने पाठवली आहे. नोटीस पाहिजे असेल तर माहितीचा अधिकार टाका असे सांगितले.त्यावर प्रमोद कदम यांनी पोस्टाने नोटीस पाठवल्याचा खुलासा मागितला त्यानंतर मात्र अधिकारी निरुउत्तर झाले. यावेळी प्रमोद कदम यांनी इंग्रजीत संवाद साधत अधिकाऱ्यांना घाम फोडला.
सध्या हा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

शेतकऱ्यांची सरकारी कार्यालयात कायमच अडवणूक केली जाते. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतो.सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमधून संतापलेल्या कदम यांनी थेट अधिकाऱ्यांना इंग्रजी भाषेत झापल्याने आता तरी कर्मचारी सुधारतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.