….आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी सुप्रिया सुळे उतरल्या रस्त्यावर
व्हिडिओ व्हायरल, सुळेंची ती प्रतिक्रिया संवेदनशीलता दाखवणारी
पुणे दि २०(प्रतिनिधी) – पुण्यात वाहतूक कोंडीचा प्रश्न दिवसेंदिवस फार बिकट होत चालला आहे. सासवड रोडवर तर वाहतूक कोंडी नित्याची असल्याचे चित्र पाहण्यास मिळते. या वाहतूक कोंडीत जर लोकप्रतिनिधी अडकले तर त्यांनाही या कोंडीचा फटका बसतो. आज फुरसुंगी येथील रेल्वे ब्रीजवर खासदार सुप्रिया सुळे या वाहतूक कोंडी मध्ये अडकल्या होत्या. पण यावेळी आपल्या गाडीतून उतरून वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या कृतीची जोरदार चर्चा होत आहे.
सुप्रिया सुळे पुण्याहून पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर निघाल्या होत्या. पण फुरसुंगी गावाजवळील रेल्वे ब्रीजवर एक कंटेनर बंद पडल्यामुळे ही कोंडी झाली होती. त्यामुळे कामाला जाणारे, महिला विद्यार्थीही अडकले होते. ही कामाला जाण्याची वेळ असल्याने कोंडीत वाढ होत होती. हे पाहून एकही क्षण न दवडता सुळे यांनी स्वतः रस्त्यावर उतरत वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांना पाहून काही स्थानिक युवकही मदतीसाठी सरसावले. थोड्याच वेळात वाहतूक पोलिसही तेथे पोहोचले. सर्वांच्या प्रयत्नांतून वाहतूक सुरळीत झाली. यावेळी नागरिकांना झालेल्या त्रासाबद्दल सुळे यांनी खेद व्यक्त केला आहे. सुळे यांच्या या कृतीचे अनेकांनी काैतुक केले.विशेष म्हणजे या मार्गाबाबत सुळेंनी वारंवार प्रशासनाबरोबरच केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांच्याशी चर्चा केली आहे. पण या रस्त्याची समस्या अद्यापही कायम आहे. पण महत्वाचे म्हणजे इतर राजकीय नेत्याप्रमाणे टिकाटिपण्णी न करता वाहतूक सुरुळीत करतानाचा त्यांचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी 'टॉप प्रायोरिटी'वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते.आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते. pic.twitter.com/sRFfh4vn0s
— Supriya Sule (@supriya_sule) October 20, 2022
हडपसर ते सासवड या पालखी महामार्गाकडे तातडीने अगदी ‘टॉप प्रायोरिटी’वर लक्ष देण्याची गरज आहे. या रस्त्याची प्रचंड अशी दुरवस्था झाली असून सातत्याने येथे वाहतूक कोंडी होते.आता तर अशी अवस्था आहे की येथे एक गाडी जरी बंद पडली तरी प्रचंड अशी वाहतूक कोंडी होते.असे ट्विट देखील खासदार सुळे यांनी केले आहे.