
प्रसिद्ध अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात खरेदी केले ड्रीम होम पण..
सोशल मिडीयावर पोस्ट करत दिली माहिती, अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव, अभिनेत्री म्हणाली मोठ कर्ज पण...
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- एक यशस्वी अभिनेत्री, उद्योजिका, सुत्रसंचालक अशी भूमिका पार पाडणारी महाराष्ट्राची क्रश अशी ओळख असणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते. सुरेख अभिनयाने जोरावर तिने रसिकांच्या मनात स्थान मिळवले आहे. आपल्या हास्याने तिने आपला विशेष चाहता वर्ग तयार केला आहे. आता पुन्हा एकदा या अभिनेत्रीची चर्चा होण्याचे कारण आहे तिने सोशल मिडीयावर केलेली पोस्ट. तिने नुकतेच एक ड्रिम होम खरेदी केले आहे.
प्राजक्ता माळीने निसर्गाच्या सानिध्यात आपले नवीन घर खरेदी केले आहे. कर्जतच्या निसर्गरम्य परिसरात प्राजक्ताने एक सुंदर फार्म हाऊस खरेदी केले आहे. त्याचे नाव देखील तिने चाहत्यांसोबत शेअर केले आहे. या घराचे नाव तिने ‘प्राजक्तकुंज’ असे ठेवले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट करत तिने चाहत्यांना याची माहिती दिली. प्राजक्ताने आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठं कर्ज घेतलंय असंही तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.आपल्या पोस्टमध्ये तिने लिहिले आहे की, “खानदानातील सर्वात सुंदर प्रॉपर्टी खानदानातल्या सगळ्यात मोठ्या कर्जासहित “असं म्हणत तिने ही बातमी दिली आहे .डोंगराच्या कुशीत आणि निसर्गाच्या सानिध्यात घर हवं ही एकच अट होती. आणि मनासारखं घर मिळालं. असं म्हणत तिने नवीन घराचा आनंद व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे प्राजक्ताने पुण्यात देखील एक फ्लॅट खरेदी केला आहे. शहराच्या गर्दीत राहण्यापेक्षा काही काळ निसर्गाच्या सानिध्यात राहून मनसोक्त आनंद लुटायचा या हेतूने तिने हे फार्महाऊस खरेदी केलं आहे. प्राजक्ताने ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळली आहे. तसेच तिने ‘प्राजक्ताराज’ नावाने दागिन्यांचा ब्रँड बाजारात आणला आहे.
तिच्या या आनंदात नेटकरीही देखील सहभागी झाले आहेत. त्यांनी तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा भरभरून वर्षाव केला आहे. प्राजक्ताच्या या पोस्टला कमेंट करुन अनेकांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. नेटकऱ्यांबरोबरच अनेक कलाकारांनीही तिच्या या यशाबद्दल फुलवा खामकर, अमृता खानविलकर, सलील कुलकर्णी, ऋतुजा बागवे या सेलिब्रिटींनी पोस्टला कमेंट करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.