Latest Marathi News
Ganesh J GIF

ड्राईव्हरच्या केबिनमध्ये बसून प्रवास करत होती व्यक्ती पण अचानक झाले असे की

बस अपघाताचा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ जोरदार व्हायरल, प्रवाशासोबत पुढे काय झाले?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- भारतात मोठ्या प्रमाणात रोड अपघाता होत असतात. सरकारच्या विविध अहवाल आकडेवारीवरून हे समोर आले आहे. दरवर्षी लाखो अपघात घडत असतात.अशातच एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यात थोडीशी चूक प्रवासाच्या चांगलीच अंगलट आली आहे. हा व्हिडिओ अंगावर शहारे आणणारा आहे.

महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर झालेला अपघात अनेकांची झोप उगवणारा ठरला आहे. यात अनेक प्रवाशांच्या होरपळून मृत्यू झाला होता. आजही अनेकजण पैसे वाचवण्यासाठी धोकादायक प्रवास करत असतात. तर अनेकजण जास्त पैसे मिळवण्यासाठी प्रवाशांच्या जीवाची काळजी न करता. वाहन चालवतात द्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओत दिसत आहे की, एक व्यक्ती केबिनमध्ये बसून बसमध्ये प्रवास करत होती. त्यावेळी बसचा दरवाजा उघडा होता. केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तीला झोप लागली. तेव्हा डुलकी घेताना त्या व्यक्तीचा तोल बिघडला आणि तो व्यक्ती थेट चालत्या बसमधून दरवाजातून खाली पडला. हा प्रकार ड्रायव्हरच्या लक्षात आल्यानंतर त्याने बस थांबवून त्या जखमी प्रवासाला रूग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. अंगावर काटा आणणारा हा व्हिडीओ@devkaranshabhadiya इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.

भारत सरकारच्या अहवालानुसार, २०२१ या वर्षात देशात एकूण ४,१२,४३२ रस्ते अपघात झाले आहेत. जास्त अपघात हे रात्रीच्या वेळेस झाले आहेत. दरम्यान या व्हिडिओवर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी या अपघाताला बस ड्राईव्हरला जबाबदार धरले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!