Latest Marathi News
Ganesh J GIF

या प्रसिद्ध अभिनेत्रीने मुंबईतील या भागात खरेदी केले कोट्यावधींचे घर

या कारणामुळे होती अभिनेत्रीवर अटकेची टांगती तलवार, हे सेलिब्रेटी असणार शेजारी, व्हिडिओ व्हायरल

मुंबई दि २(प्रतिनिधी)- बॉलीवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने मुंबईत एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जॅकलीन फर्नांडिसचे नवीन घर एका बहुमजली अपार्टमेंटमध्ये असल्याचे व्हिडिओमधून समोर आले आहे.

जॅकलिन फर्नांडिस नेहमीच तिच्या पर्सनल आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते. सुकेश बरोबरच्या प्रेम प्रकरणामुळे देखील ती चांगलेच चर्चेत आणि अडचणीत आली होती. जॅकलिनने मुंबईत एक नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. यापूर्वी जॅकलिन प्रियांका चोप्राच्या जुहू येथील घरात राहत होती, जे तिने २०२१ मध्ये घेतले होते. जॅकलिन फर्नांडिसने पाली हिल, वांद्रे येथे तिचे नवीन घर विकत घेतले आहे. ज्या ठिकाणी जॅकलिनने तिचे नवीन घर विकत घेतले आहे. त्याठिकाणी अनेक कलाकार राहतात. याठिकाणी सैफ अली खान, करीना कपूर, रणबीर कपूर आणि आलिया भट्टसह अनेक सेलिब्रिटी राहतात. सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानी यांनी अभिनेत्रीच्या घराचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलिनची बिल्डिंग दिसत आहे. तथापि, अभिनेत्रीने अद्याप तिच्या नवीन घराबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. जॅकलीनचे हे घर १११९ चौरस ते २५५७ चौरस मीटरपर्यंत पसरले आहे. टाईम्सच्या रिपोर्टनुसार या घराची किंमत १२ कोटी रुपये आहे. याआधी तिने प्रियांकाकडून कर्मयोग ही इमारत ७ कोटी रूपयांना विकत घेतली होती. जॅकलीन मागच्या काही दिवसांपासून ठग सुकेश चंद्रशेखरमुळे चर्चेत आहे. ठग सुकेश तिला अनेकदा जेलमधून पत्र लिहित असतो. तिच्या वाढदिवसाला देखील त्याने एक खास पत्र लिहिलं होते.

जॅकलीन लवकरच अभिनेत्री वैभव मिश्राच्या फतेह चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती सोनू सूद आणि विजय राज यांच्यासोबत काम करणार आहे. जॅकलीनने या वर्षी मार्चमध्ये क्राईम अॅक्शन चित्रपटाचे पहिले शेड्यूल पूर्ण केले. याशिवाय ती अभिनेत्री आदित्य दत्तच्या क्रैक – जीतेगा तो जियेगा या अॅक्शन स्पोर्ट्स चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात ती विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपालसोबत दिसणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!