प्रसिद्ध अभिनेत्रीने गळफास घेत संपवली जीवनयात्रा
धक्कादायक कारण समोर, तिचा 'तो' व्हिडिओ होतोय अचानक व्हायरल
इंदूर दि १७(प्रतिनिधी)- प्रसिध्द टीव्ही अभिनेत्री आणि ये रिश्ता क्या कहलाता हे फेम वैशाली ठक्कर हिने इंदूरमध्ये गळफास लावून आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तीचा मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी घटनास्थळावरून सुसाईड नोटही जप्त केली आहे. मात्र तिच्या आत्महत्येनंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
वैशाली ठक्कर गेल्या एक वर्षापासून इंदूरमध्ये राहत होती. तिने गळफास लावून आत्महत्या केल्यानंतर तेजाजी नगर पोलिसांनी तपास सुरु केला असून प्राथमिक तपासात हे प्रेमप्रकरण असल्याचे सांगण्यात येत आहे. वैशाली तिच्या खोलीतून बाहेर न आल्याने वडिलांनी तिच्या खोलीत जाऊन पहिले असता ती फासावर लटकत असल्याचे त्यांन दिसले. त्यांनी लगेच फोन करत ही माहिती पोलिसांना दिली. पोलीसांनी तातडीने घटनास्थळी दाखल झाले, मृतदेह शवविच्छेदनासाठी इंदूरच्या एमवाय हॉस्पीटलमध्ये पाठवला आहे रिपोर्टनंतर आणखी खुलासा होणार आहे. खोलीमध्ये सापडलेल्या सुसाईड नोटही सापडली असून त्यात प्रेमप्रकरनासह विविध प्रकारच्या त्रासाचा उल्लेख आहे. त्या आधारे पोलीस तपास करत आहेत.
मृत्यूच्या काही दिवसांपूर्वी वैशाली टक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये वैशाली ‘बेबी, मी तुझ्यासाठी एक गाणं गाऊ?’ यानंतर ‘दिल, जिगर, नजर काय आहे मी तुझ्यासाठी जीवही देईल’ हे गाणे म्हणते. इन्स्टाग्रामवर वैशालीचा हा व्हिडिओ तिच्या आत्महत्येनंतर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.