Latest Marathi News
Ganesh J GIF

बाॅलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री पडली चक्क या मोदीच्या प्रेमात

सोशल मिडीयावर तो फोटो आणि व्हिडीओ व्हायरल, चाहते उत्सुक, अभिनेत्री म्हणाली...

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीमध्ये श्रद्धा कपूरने ओळख निर्माण केली आहे. तीने बॉलीवूडमध्ये अनेक हीट चित्रपटातून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. मात्र श्रद्धा कपूर ही अभिनयासाठीच नाही तर आपल्या सौंदर्यासाठीदेखील प्रसिद्ध आहे. परंतु आता अभिनेत्री श्रद्धा कपूर ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.

काही दिवसांपूर्वी श्रद्धा कपूर तू झूठी मै मक्कार या चित्रपटाचे रायटर राहुल मोदी यांच्यासोबत चित्रपट पाहण्यास गेली होती. याशिवाय अनेकदा ते एकत्र दिसून आले होते. त्यामुळे ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे म्हटले जात आहे. अभिनेत्री श्रद्धा कपूरच्या आयुष्याला पुन्हा एकदा प्रेम मिळाले आहे. राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर एकमेकांना डेट करत आहेत, असा अंदाज चाहते लावत आहेत. या आधी श्रद्धा कपूर सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा होती. राहुल मोदी किंवा श्रद्दा कपूर यांनी त्यांच्या नात्यावर कोणतेही अधिकृत भाष्य केले नाही. मात्र त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओनंतर नेटकरी त्यांच्या नात्याबद्दल अंदाज बांधताना दिसत आहेत. राहुल अनेकदा श्रद्धा कपूरच्या कुत्र्यासोबतचे फोटो शेअर करत असतो. राहुल आणि श्रद्धाच्या या वाढत्या नात्याबद्दल चाहत्यांना उत्सुकता असणार आहे. दरम्यान श्रद्धा कपूर आणि राहुल मोदी. दोघं कार्तिक आर्यनचा ‘सत्यप्रेम की कथा’ चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. इंटरनेटवर समोर आलेल्या फोटोंमध्ये, श्रद्धा अतिशय सिंपल लूकमध्ये दिसतेय. तिने पांढऱ्या रंगाचा कॉटनचा ड्रेस घातला होता.

श्रद्धा राजकुमार राव सोबत स्त्री २ मध्ये ती दिसून येणार असून सध्या या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. दरम्यान राहुल मोदी हे श्रद्धा कपूरच्या नुकत्याच रिलीज झालेल्या ‘तू झुठी मैं मक्कार’ या सिनेमाचे लेखक आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!