Latest Marathi News
Ganesh J GIF

ही फेमस अभिनेत्री लवकरच अडकणार लग्नबंधनात

भावी जोडीदाराबद्दलच्या सांगितल्या अपेक्षा, सांगेल ते ऐकणारा हवा म्हणत त्याला महाराजांची....

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- प्रतिमासंपन्न नृत्यांगना आणि अभिनेत्री माधुरी पवारने आयुष्यात खूप संघर्ष केला आहे, तिने झोपडपट्टीतील पत्र्याच्या घरात राहून स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं. तसेच मोठ्या हिमतीने आपले स्थान निर्माण केले आहे. तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये माधुरीने तिला लग्नासाठी नेमका कसा मुलगा पाहिजे? याविषयी मोठा खुलासा केला आहे.

आपल्या जोडीदाराविषयी बोलताना माधुरी म्हणाली की, मी लग्न करेन की नाही, हाच मोठा प्रश्न आहे. मला आता तरी लग्न करावं असं वाटत नाही. कारण करिअर आणि इतर जबाबदाऱ्या खूप आहेत. या सगळ्यात मला एक जोडीदार मिळाला तर त्याला उत्तम मराठी यायला हवं. कारण माझं मराठीवर खूप प्रेम आहे. त्याला महाराष्ट्राचा इतिहास माहीत असावा. छत्रपती शिवाजी महाराजांची कारकिर्द त्याला माहीत असावी. तो स्त्रीचा, तिच्या मतांचा आदर करणारा असावा. तो त्याच्या आई-वडिलांचा आदर करणारा असावा. जर तो त्याच्या पालकांचा आदर करत असेल तरच तो माझ्या आई-वडिलांचा आदर करू शकेल. तसेच तो खूप श्रीमंत असावा, प्रचंड पैसा कमावणारा असावा असे काहीच नाही. माझाही साड्या आणि चपला शिवाय फार खर्च नाही. त्यामुळे जेमतेम कमावणारा असला तरी देखील मला चालेल. दिसायला तो खूप सुंदर असावा, असे देखील काही नाही, परंतु  मला सावळी मुलं खूप आवडतात. कारण मी देखील सावळीच आहे. यामुळे मला सावळी किंवा गव्हाळ रंगाची मुलं छान वाटतात असेही ती म्हणाली आहे. महत्वाचे म्हणजे मुलाचे केस चांगले असावेत, माझ्यापेक्षा थोडा उंच असावा आणि आयुष्यभर मी सांगेल ते ऐकणारा पाहिजे. अशी अनोखी अपेक्षाही तिने व्यक्त केली आहे. यावेळी तिने आपल्या ड्रीम घराबद्दल देखील सांगितले आहे.

पण चार खोल्यांचं घर असावं असं वाटतं. त्यात स्वयंपाकघर, हॉल, माझी खोली आणि एक पाहुण्यांसाठी खोली असेल. मला कौलारू घरं खूप आवडतात. असे माधुरीने सांगितले आहे. माधुरी पवारने ‘रानबाजार’ या मराठी वेब सीरिजमध्ये प्रेरणा पाटील नावाची भूमिका साकारली होती. याशिवाय तिने ‘देव माणूस’ व ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!