Latest Marathi News
Ganesh J GIF

अभिनेत्रीला या फायनान्सरने दिली जीवे मारण्याची धमकी

फायनान्सर विरोधात केला विनयभंगाचा गुन्हा दाखल, बघा प्रकरण काय

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- अभिनेत्री शर्लिन चोप्राने एका फायनान्सर विरोधात जुहू पोलिस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा दाखल केला आहे. या फायनान्सरने एका व्हिडिओ रेकाॅर्डिंगसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने जवळीकता साधत चुकीचा स्पर्श केला असल्याचा दावा तिने केला आहे. त्याची चर्चा होत आहे.

शर्लिन चोप्राने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, एका फायनान्सरने एका व्हिडीओच्या रेकॉर्डिंगकरिता शर्लिनला बोलवण्यात आले होते. यावेळी त्याने तिच्याबरोबर विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान शर्लिनने विरोध करायला सुरुवात केली. त्यावेळी तो तिला घाणेरड्या शिव्या देऊ लागला. तसेच त्याने तिला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. शर्लिन चोप्राच्या तक्रारीनुसार पोलिसांनी फायनान्सरविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी सुनिल लोढा विरोधात विविध कलमाखाली गुन्हा नोंद केला असून सध्या ते याप्रकरणाचा तपास घेत आहेत. फायनान्सरने एका व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी पैसे देण्याच्या बहाण्याने शर्लिनसोबत जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला. असे तक्रारीत सांगण्यात आले आहे. दरम्यान शर्लिन चोप्रा दररोज नवनवीन खुलासे करून सर्वांना आश्चर्यचकित करते. याआधीही तिच्यात आणि राखी सावंतमध्ये बरेच वाद झाले होते. त्या दोघींनी मीडियासमोर एकमेकांवर जोरदार आरोप केले होते. तसेच शर्लिन चोप्राने राज कुंद्रा प्रकरणातही वक्तव्य केले होते. आता पुन्हा शर्लिन चोप्रा या नवीन प्रकरणामुळे चर्चेत आली आहे. यापूर्वी शर्लिन चोप्राने चित्रपट निर्माता साजिद खानबद्दलही बरीच विधाने केली होती.

 

शार्लीन चोप्रा बिग बाॅसमध्ये असताना तिने सलमान खानवर देखील आरोप केले होते. सलमान खानसाठी त्याची मैत्री महत्वाची आहे की महिलासांठी ठोस भूमिका घेणं महत्वाचं आहे ? जर आम्ही त्याच्या बहिणी असतो, तर तो असं वागला असता का ? सलमान आणि बाकीचे सगळे शांत का आहेत? आता शर्लिनने केलेल्या तक्रारीविरोधात पोलीस काय कारवाई घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!