Latest Marathi News
Ganesh J GIF

‘राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसचे एवढे आमदार संपर्कात’

देवेंद्र फडणवीस यांचा मोठा दावा, उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठा दावा

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात २०१९ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या अगोदर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले होते. आता पुढील वर्षातही लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुका होणार आहेत. अशावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस मधील काही आमदार भाजपात येणार असल्याचे संकेत दिले आहेत.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले की, आमच्या संपर्कात अजुनही अनेक आमदार आहेत. पक्षाची गरज कधीच संपत नाही. काही मतदारसंघ असे आहेत तिथे आम्ही अजुनही पोहोचलेले नाही. त्यामुळे तिथेही पोहोचायला मिळाले तर चांगलच आहे. गेल्या पाच वर्षात अनेक लोक भाजपसोबत आहेज आहेत. आताही संपर्कात अनेक लोक आहेत.पण, त्यातील किती लोक भाजपमध्ये येतील हे आजच पक्क असं सांगतात येत नाही. आमदार आमच्या संपर्कात असतात. असे फडणवीस म्हणाले त्याचबरोबर ते पुढे म्हणाले की, उध्दव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. ते म्हणाले की, ज्यांनी सुप्रीम कोर्टाची सुनावणी बघितली, त्यांच्या हे लक्षात आलं असेल की, उध्दव ठाकरे हे फ्लोअर टेस्टला सामोरे गेले नाहीत. त्यामुळं त्यांचं सरकार पुन्हा येऊ शकत नाही. मी स्वत: वकील आहे. त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर सुप्रीम कोर्ट त्यांनी दिलेला राजीनामा रद्द करून त्यांना मुख्यमंत्री पदाच्य खुर्चीवर परत कसं आणून बसणार? असा सवालही फडणवीस यांनी विचारला आहे.

सुप्रीम कोर्टाच्या निकालाबद्ल अंदाज वर्तवण चुकीचं आहे. पण, सुप्रीम कोर्टाचा निकाल आम्हाला योग्य असाच येईल. मी माझं भाकीत सांगतो की, एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्याच मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात निवडणुकीला सामोर जाऊ. हे सरकार स्थिर अशून या सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही. एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहतील, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!