Just another WordPress site

प्रेयसीने केला प्रियकराच्या पत्नीचा खुन

पुणे जिल्ह्यातील खळबळजनक घटना, आरोपी प्रेयसी अटकेत

पुणे दि २१(प्रतिनिधी)- पतीच्या प्रेयसीने या प्रियकराच्या पत्नीचा तिच्याच ओढणीने गळा आवळून खुन केल्याची खळबळजनक घटना राजगुरूनगर मध्ये उघडकीस आली आहे. पती कंपनीत कामाला गेल्यावर घरात एकटी असलेल्या पत्नीचा गळा आवळून खुन झाला होता. घटना घडल्यावर दोन दिवसांत खुन पतीच्याच प्रेयसीने केल्याचा उलगडा करून खेड पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांनी प्रेयसीला जेरबंद केले आहे.

GIF Advt

राजगुरुनगरमध्ये १६ नोव्हेंबरला शिवसाम्राज्य सोसायटी येथील राहत्या घरी कोमल गणेश केदारी ही मृतावस्थेत आढळून आली होती. तिचा पती गणेश भिकाजी केदारी हा कामावर गेला असताना दुपारी एकटी घरात झोपली असताना तिचा कोणीतरी आज्ञात इसमाने गळा आवळुन खून केला होता. पण पोलीसांनी लावलेल्या छड्यात पत्नीची प्रेयसी स्वाती सुभाष रेंगडे असे आरोपीचे नाव आहे. तिचे मृत कोमल केदारी यांचे पती गणेश केदारी याच्यासोबत काही वर्षांपासून अनैतिक प्रेमसंबंध होते. या दोघांमध्ये कोमल वरुन अनेकवेळा वाद होत असत. याच रागातून स्वातीने बुधवार रोजी गणेश घरी नसताना घरात घुसून कोमलचा गळा दाबून खून केला होता. पोलीसांनी त्या प्रेयसीला अटक केली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, खेडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड , अभिजीत सावंत, विक्रम तापकीर, राजू मोमीन , निलेश सुपेकर, दगडु विरकर,शंकर भवारी, कैलास कड, संतोष घोलप , संतोष मोरे, सचिन जतकर, प्रविण गेंगजे, निलम वारे यांच्या पथकाने या गुन्ह्याची उकल केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!