ही विश्वसुंदरी प्रसिद्ध व्यावसायिकाला करतेय डेट
दोघेही अनेक ठिकाणी दिसले एकत्र, कुटुंबीयांचीही अनुमती?
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- अभिनेत्री आणि २०१७ मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकलेली मॉडेल मानुषी छिल्लर ही नेहमीच तिच्या ग्लॅमरस लूक्समुळे चर्चेत असते. २०२२ मध्ये तिचा पहिला बॉलिवूड चित्रपट सम्राट पृथ्वीराज प्रदर्शित झाला होता. तिने अक्षय कुमारबरोबर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता ती पुन्हा एकदा तिच्या रिलेशनशीपमुळे चर्चेत आली आहे.
मानुषीने आतापर्यंत कधीही तिच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल जाहीर खुलासा केलेला नाही. पण आता ती एका व्यावसायिकला डेट करत असल्याच्या चर्चा बी टाउनमध्ये रंगल्या आहेत. विशेष म्हणजे आजवर तिचं नाव कुणासोबतही जोडलं गेलं नव्हतं पण आता ती भारतातील आघाडीची ब्रोकरेज कंपनी झिरोधाचा सह-संस्थापक निखिल कामथ याला डेट करत असल्याची चर्चा आहे. नुकतंच दोघ एकत्र ऋषिकेशला फिरायला गेले होते. असे त्यांच्यातील एका जवळच्या व्यक्तीच्या हवाल्यावर सांगितले जात आहे. मानुषीला तिच्या करीअरवर लक्ष केंद्रित करत असल्यामुळे तिला तिच्या वैयक्तिक जीवनाबद्दल मीडियासमोर खुलासा केलेला नाही. त्यामुळे या नात्यावरही दोघांनी अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. मानुषी आणि निखिल यांच्या कुटुंबियांमध्येही जवळचे संबंध आहेत. असे सांगण्यात येत आहे.

निखिल कामथने बंगळूरमधील उद्योजिका अमांडा पूर्वांकरा हिच्यासोबत १८ एप्रिल २०१९ ला इटलीमध्ये लग्न केलं होतं. मात्र वर्षभरातच दोघेही विभक्त झाले. आता तो मानुषी छिल्लरला डेट करत आहे. मानुषीने 2017 मध्ये ‘मिस वर्ल्ड’चा किताब जिंकला होता. तेव्हापासून ती प्रकाशझोतात आली. तिच्या एकमेव सम्राट पृथ्वीराज चित्रपटात तिने संयोगिताची भूमिका साकारली होती.