भंडारा दि २० (प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यात कृष्ण विसर्जनासाठी एका छोट्या नावेने वैनगंगा नदीपात्रात जाणे ६ जणांच्या जीवावर बेतले असते, मात्र दैव बलवत्तर म्हणून सहा जण थोडक्यात बचावले आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या खमारी बुटी गावात घडली.
‘देव तारी त्याला कोण मारी!’, या म्हणीचा प्रत्यय यावेळी आला आहे. त्याच झाल अस की, कृष्णभक्तांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या नावेत क्षमतेपेक्षा जास्त लोक बसले होते. नदीपात्रात गेल्यावर ही नाव उलटली. नावेतील सहा जण पाण्यात बुडाले. पण आजुबाजूला असलेल्या नावाड्यांनी त्यांना वाचविले. हा संपूर्ण थरार एका भाविकाने कॅमेऱ्यात कैद केला आहे.. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. या सहा जणांना भगवान कृष्णाने वाचविल्याच्या प्रतिक्रिया सोशल मिडीयावर नेटकरी व्यक्त करय आहेत.