Latest Marathi News
Ganesh J GIF

जगातील सर्वात सुंदर राजकुमारी अडकली लग्नबंधनात

सोशल मिडीयावर राजकुमारीची जोरदार चर्चा, सुंदरीने हिजाबला दिला होता नकार

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- दुबईची राजकुमारी शेख महारा सध्या सोशल मीडियावर वर्चस्व गाजवत आहे. महारा ही देशाचे उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान शेख मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांची मुलगी आहे. महाराची फॅन फॉलोइंगही जबरदस्त आहे. तिचे फोटो पाहून ती खूपच स्टायलिश असल्याचे बोलले जात आहे. तसेच तुचे छंदही राजेशाही असल्याचे सांगितले जात आहे.


शेखा महारा हिचे नुकतेच लग्न झाले आहे. तिचा विवाह शेख माना बिन मोहम्मद बिन रशीद बिन माना अल मकतूम यांच्याशी झाला आहे. दुबईच्या या शाही लग्नाची सर्वत्र चर्चा होती.दोघांनीही इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लग्नाची घोषणा करताना त्यांनी लग्नाच्या करारावर स्वाक्षरी करण्याचा सोहळा म्हणजेच ‘किताब अल-किताब’चे फोटो शेअर केले होते. महत्वाचे म्हणजे दुबईमध्ये इस्लामी नियम अतिशय काटेकोरपणे पाळले जातात पण २६ फेब्रुवारी १९९४ ला जन्मलेली महारा इस्लामिक नियम पाळताना दिसत नाही. महाराही शेख रशीद यांची लाडकी मुलगी आहे. युएई मधील विविध प्रदर्शने, फॅशन शो आणि पुरस्कार सोहळ्यांमध्ये शेखा महाराला अनेकदा पाहिले जाते. तिचे फोटोही ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत असते. महाराचे पती शेख माना हा दुबईतील रिअल इस्टेट आणि तंत्रज्ञानातील अनेक यशस्वी उपक्रमांमध्ये गुंतलेला एक व्यापारी आणि उद्योजक आहे. २९ वर्षीय शेखाने ब्रिटनच्या एका विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांची पदवी घेतली आहे. काही काळापूर्वी त्यांनी मोहम्मद बिन रशीद प्रशासनाकडून महाविद्यालयीन पदवी प्राप्त केली आहे.

महाराला घोडेस्वारीची आवड आहे.तसेच तिच्याकडे कारची मोठी रेंज आहे. सुंदर राजकुमारी अशी ओळख असलेल्या महाराने दुबई सरकारच्या कम्युनिटी डेव्हलपमेंट अथॉरिटीला शाही कुटुंबाच्या भेटीसाठी मुख्य राजदूत म्हणून काम केले आहे. तसेच ती सामाजिक कार्यक्रमातही दिसून आली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!