Latest Marathi News
Ganesh J GIF

देशातील तब्बल २९ मुख्यमंत्री आहेत करोडपती

सर्वात श्रीमंत आणि गरीब मुख्यमंत्र्यांकडे एवढी संपत्ती, एकनाथ शिंदेचा 'कितवा' नंबर

दिल्ली दि १३(प्रतिनिधी)- देशात एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांच्या संपत्तीवरुन ईडी सीबीआय अशा संस्थाचा वापर होत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. पण आता असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स संस्थेच्या अहवालात देशातील मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे. यानुसार देशातील ३० पैकी तब्बल २९ मुख्यमंत्री कोट्याधीश आहेत.

देशातील राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या प्रतिज्ञा पत्राचा आधारे एडीआर आणि इलेक्शन वॉच या संस्थांनी हा अहवाल तयार केला आहे. जम्मू काश्मीरमध्ये सध्या मुख्यमंत्री नसल्याने हे राज्य वगळण्यात आले आहे.यात आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे ५१० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे फक्त १५ लाख रुपयांची संपत्ती आहे.अरुणाचल प्रदेशचे पेमा खंडू दुसऱ्या क्रमांकावर आहेत. खंडू यांची संपत्ती १६३ कोटी रुपये इतकी आहे. ओडिशाचे नवीन पटनाईक ६३ कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. केरळच्या पी. विजयन तसेच हरियानाच्या मनोहरलाल खट्टर यांच्याकडे प्रत्येकी एक कोटी रुपयांची संपत्ती आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रत्येकी तीन कोटी रुपयांची संपत्ती आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ११ कोटी ५६ लाख १२ हजार रुपयांची संपत्ती आहे. सर्वाधिक देणे असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या यादीत शिंदे तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची देणी ३ कोटी ७४ लाख ६० हजार रुपयांची आहेत. सर्वाधिक देणी असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये तेलंगणचे के. चंद्रशेखर राव ८ कोटी ८८ लाख रुपयांसह पहिल्या तर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई ४ कोटी ९९ लाख रुपयांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. सर्व मुख्यमंत्र्यांच्या सरासरी संपत्तीचा आकडा काढल्यास तो ३३.९६ कोटी रुपये इतका येतो. अर्थात ही आकडेवारी निवडणुकीवेळी दिलेल्या शपथपत्रावर आधारित आहे.

गुन्ह्याचा विचार केल्यास सर्वाधिक गुन्हे दाखल असलेल्या मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्रशेखर राव ६४ गुन्ह्यांसह पहिल्या क्रमांकावर आहेत. यात ३७ गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्यावर ४७ गुन्हे दाखल असून, त्यातील दहा गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जगनमोहन रेड्डी यांच्यावर ३८ गुन्हे असून, त्यातले ३५ गंभीर स्वरूपाचे आहेत. तर चौथ्या क्रमांकावर असलेल्या एकनाथ शिंदे यांच्यावर १८ गुन्हे दाखल असून, त्यातील एक गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!