Just another WordPress site

आईने अल्पवयीन मुलीचे स्वतः प्रियकराशी लावले लग्न

पुण्यात नात्याला काळीमा फाडणारी घटना, पोलिसांची कारवाई

पुणे दि १२(प्रतिनिधी)- पुण्यात आई आणि लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे
एका महिलेनं १५ वर्षीय लेकीचे स्वतःच्या प्रियकरासोबत लग्न लावून दिल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेप्रकरणी पीडित मुलीची आई आणि तिच्या प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

GIF Advt

सागर जयराम दातखिळे असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा उस्मानाबादचा आहे. तर आईचे नाव चंद्रकला शहादेव मखर आहे. पीडीत मुलगी आईसोबत पुण्यातील वडगावशेरी येथे वास्तव्याला होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकला शहादेव मखर मुलीला घेऊन आपल्या गावी गेल्या होत्या. तिथे एका लग्नामध्ये तिची ओळख सागर बरोबर झाली. त्यानंतर आरोपी सागर हा पुण्यात अनेकवेळा घरी येत होता. त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. मुलालाही ती सावरला बाबा म्हणायला लावायची पण एके दिवशी आईने पीडित मुलीला तू सागरशी लग्न कर, नाहीतर मी जीव देईन, अशी धमकी दिली. या भीतीपोटी १५ वर्षीय मुलीने सागर बरोबर लग्न केले. त्यानंतर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. मुलीला हा प्रकार शाळेतील मित्राला सांगितल्यानंतर याची माहिती एका महिलेला मिळाली आणि हा प्रकार समोर आला.

पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सागर जयराम दातखिळे आणि आरोपी आई चंद्रकला शहादेव मखर या दोघांविरोधात बलात्कार, बालविवाह प्रतिबंधक अधिनियम कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास चंदननगर पोलिस करत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!