फॅशन डिझायनर पत्नीची हत्या, पण वेगळेच सत्य समोर
माहेरी जाताना दुचाकीस्वारांनी गोळ्या झाडून हत्या, समोर आलेले सत्य पाहून पोलिसही चकित, काय घडले?
पूर्णिया दि २२(प्रतिनिधी)- दुर्गापूजेसाठी माहेरी जाणाऱ्या महिलेवर यावेळी रस्त्यावर तीन जणांनी तिची गोळ्या घालून हत्या केली होती. पण आता या प्रकरणी वेगळेच सत्य समोर आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. नवीन खुलाश्यामुळे पोलीस देखील चकित झाले आहेत.
पोलीसांनी महिलेच्या हत्येप्रकरणी पतीलाच अटक केली आहे. पिंकी कुमारी उर्फ किरण असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्णिया जिल्ह्यातील रामबाग येथील लालन यादव यांचा विवाह पिंकी कुमारी बरोबर २००९ साली झाला होता. पिंकी ही फॅशन डिझायनर होती. करोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन दरम्यान दिल्लीहून परतली होती. घटनेच्या दिवशी लालन दुर्गापूजेसाठी आपल्या पत्नीला घेऊन तिच्या माहेरी चालला होता. पण त्याचवेळी तिन जणांनी पिकींची गोळ्या झाडून हत्या केली. पण पिंकीच्या माहेरच्या लोकांनी पतीनेच तिची हत्या केलाचा आरोप केला आहे. पिंकीचे वडील रामानंद यादव म्हणाले की, जावयाला आपल्या मुलीच्या नावे असलेली जमीन स्वतःच्या नावावर करून घ्यायची होती. त्यामुळेच त्याने ही हत्या केली आहे. त्याचबरोबर तो तिला सतत मारहाण करायचा असा आरोप केला आहे. विशेष म्हणजे पिंकी ही तीन महिन्याची गरोदर असल्याचा दावा पिंकीच्या आईने केला आहे. लालन यादव आणि प्रदीप यादव यांनीच माझ्या बहिणीची हत्या केलाचा आरोप केला आहे. तसेच लग्नाच्या वेळी ललन हा सॉफ्टवेअर इंजिनीअर होता असे सांगितले होते. पण ते देखील खोटे होते असाही आरोप पिंकीच्या माहेरच्यांनी केला आहे.
महिलेच्या पतीने कट रचून पत्नीची हत्या घडवून आणली. तो ज्या ऑटो रिक्षामध्ये पत्नीला घेऊन जात होता, तो चालक त्याचा नातेवाईक होता. दुचाकीवरून पाठलाग करणारे दोघेही आपले नातेवाईक असल्याची कबुली लालनने दिली आहे. अशी माहिती पोलीसांनी दिली आहे. आता इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.