
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या चौथ्या दिवशी देखील विरोधकांनी घोषणाबाजी करत विधानभवन दणाणून सोडले. विरोधकांनी आज ५०-५० बिक्सिटचे पुडे दाखवत ‘५०-५० चलो गुवाहाटी’ अशा अनोख्या पद्धतीने घोषणा दिल्या.
विरोधक अधिवेशन काळात रोज नवनव्या घोषणा देत आहेत. त्यामुळे आज ते घोषणा देणार याकडे लक्ष होते
आज सर्व विरोधक चक्क बिस्कीटचे पुडे हातात घेत घोषणाबाजी केली आहे. यावेळी ओला दुष्काळ जाहीर करण्याचीही मागणी करण्यात आली. याआधी विरोधकांनी ‘आले रे आले गद्दार आले’, ‘विकास कामांना स्थगिती देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो’, ’५०खोके ५० खोके, खाऊन खाऊन माजलेत बोके’, ‘ईडी सरकार हाय, हाय, सीबीआय सरकार हाय, हाय’ अशा घोषणा दिल्या आहेत. विशेष म्हणजे सत्ताधारी सभागृहात येत असतानाच या घोषणा देण्यात येत असतात. एकनाथ शिंदे यांनाही त्याचा अनुभव आला आहे. त्यांनी तोडीस तोड उत्तर द्या असे आदेश दिले होते पण शिंदे गट कुठेही प्रभाव टाकू शकला नाही.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या आंदोलनात विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे यांच्यासह महाराष्ट्र विकास आघाडीचे आमदार सहभागी झाले होते.पण धनंजय मुंडे उपस्थित नसल्याने वेगळी कुजबूज सुरु होती.