Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकप्रिय अभिनेत्रीने गळफास घेत संपवलं आयुष्य

चित्रपट सृष्टीवर दुखाचा डोंगर, हॉटेलमध्ये सापडला मृतदेह, कारण अस्पष्ट

बनारस दि २६(प्रतिनिधी)- भोजपूरी अभिनेत्री आकांक्षा दुबेनं बनरासमधील एका हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. सारनाथ ठाण्याच्या क्षेत्रातील सोमेंद्र हॉटेलमध्ये मॉडेल आणि अभिनेत्री आंकाक्षा हिनं गळफास घेतला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

आकांक्षा बनारसमध्ये तिच्या आगामी प्रोजेक्टचं शूटिंग करत होती. काल रात्री आकांक्षा शूटिंगनंतर हॉटेलमध्ये गेली आणि तिथे जाताच आत्महत्या केली. आकांक्षाने आत्महत्या का केली? हॉटेलमध्ये गेल्यावर अचानक काय झालं की आकांक्षाला टोकाचं पाऊल उचलावं लागलं? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. त्यामुळे भोजपूरी चित्रपटसृष्टीवर दुख:ची छाया पसरली आहे. आकांक्षा दुबेच्या या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही. पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आकांक्षा दुबेचा जन्म १९९७ मध्ये उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे झाला. २०१९ मध्ये ‘मेरी जंग मेरा फैसला’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यात त्याची छोटीशी भूमिका होती. ही भूमिका छोटी असली तरी आकांक्षा त्यात रमली होती. यानंतर आकांक्षाने ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘साजन’ सारखे चित्रपट केले, जे हिट ठरले. टिकटाॅक आणि इनस्टाग्रामच्या माध्यमातून आकांक्षाला चांगलीच लोकप्रियता मिळाली. टिकटॉकवर तिचे व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या काही मिनिटांत व्हायरल व्हायचे. इन्स्टाग्रामवरदेखील तिचे १.७ मिलियन फॉलोअर्स आहेत.आत्महत्येच्या एक दिवस आधी आकांक्षा दुबेने तिचा एक रील इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

चित्रपटांव्यतिरिक्त आकांक्षाने अनेक चांगल्या गाण्यांच्या म्युझिक व्हिडिओमध्येही काम केले. 2021 मध्ये आलेले अभिनेत्रीचे ‘तुम जवान हम लिका’ हे गाणे ब्लॉकबस्टर हिट ठरले. त्याने खेसारी लाल यादव यांच्यासोबत ‘नच के मालकिनी’ या व्हिडिओमध्येही काम केले होते. त्याच्या ब्लॉकबस्टर हिट गाण्यांमध्ये ‘भुरी’, ‘काशी हिले पटना हिले’, ‘नमरिया कमरिया में खोस देब’ यांचा समावेश आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!