
गौतमी पाटीलची ‘पाटलांचा बैलगाडा’ गाण्यावर तरुणाशी जुगलबंदी
गौतमीच्या क्रार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल, तरुणाची गाैतमीला जोरदार टक्कर
शिर्डी दि २५(प्रतिनिधी)- लावणी नृत्यांगना गौतमी पाटील नेहमी चर्चेत असते. ती जिथे कार्यक्रमाला जाते नवीन गोंधळ होतो. त्यामुळे ती चर्चेत असते. आता तिचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओ मध्ये तिच्या बरोबरीने डान्स करून एका तरुणाने चक्क जुगलबंदी केली आहे. जुगलबंदीचा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावच्या कोळपेवाडी येथील महेश्वर यात्रेच्या निमित्ताने गौतमीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमात गौतमी पाटील नाचत असताना मंचासमोर एका तरुणाने गौतमी सारखा डान्स करण्याचा प्रयत्न करुन गौतमीला टक्कर दिली. यावेळी गौतमी पाटील आणि या तरूणात चांगलीच जुगलबंदी रंगलेली पाहायला मिळाली. व्हिडिओत दिसतंय की, स्टेजवर गौतमी पाटलांचा बैलगाडा या गाण्यावर नाचत आहे. तिला टक्कर देत हा तरुण स्टेजखाली नाचत आहे. गौतमी सारखाच डान्स करण्याचा प्रयत्न केल्याने त्या तरुणाची जोरदार चर्चा होत आहे. या तरुणाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे राहणारा पवन चव्हाण असे त्या तरुणाचे नाव आहे. त्याचे वडील रामसिंग हे सेंटरींग काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने पवनने सातवीतच शिक्षण सोडलं. मात्र, नृत्याची आवड असल्याने तो गेल्या तीन वर्षांपासून नृत्य शिकतोय. गाैतमीने देखील पवनचे काैतुक केले आहे. गौतमीचा लवकरच ‘घुंगरू’ नावाचा चित्रपट येतो आहे. या चित्रपटाचे शूटिंग थायलंडमध्ये पार पडले. याशिवाय सोलापूर, माढा, हंपी या ठिकाणीही चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे.
गौतमीच्या कार्यक्रमात होणारी गर्दी पाहता गौतमी येण्याचे मेसेज व्हायरल झाल्यानंतर आयोजकांच्या वतीने अत्यंत गोपनीयता पाळण्यात आली. मात्र तरीही गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गर्दी आणि गोंधळ झालाच असून पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की, तरुणांनी प्राधान्याने हजेरी लावली असते. यावरुन कळतं की गौतमीचं तरुणांमध्ये किती क्रेझ आहे हे दिसून येते.