Latest Marathi News
Ganesh J GIF

लोकप्रिय अभिनेत्रीने या जोडीदारासोबत गुपचूप उरकला साखरपुडा

अभिनेत्रीने सोशल मिडीयावर फोटो पोस्ट करत दिली माहिती, भावी जोडीदाराचे नाव गुलदस्त्यात, चाहत्यांना उत्सुकता

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री पूजा सावंत ही नेहमी तिच्या अभिनयाबरोबर सौंदर्यामुळे चर्चेत असते. आपल्या सहजसुंदर अभिनयाने आणि सौैंदर्याने पुजाने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली आहे. पण आता पूजा सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण पूजा सावंत विवाहबंधनात अडकणार आहे.

पूजाने तिच्या सोशल मीडिया अंकाऊटवर तिचे एका तरुणासोबतचे फोटो शेयर केले आहेत. मात्र, हा कोण आहे हे काही तिने मात्र सांगितलेले नाही. पुजाने नुकतंच इंन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केले आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळील फोटो आहे. “ज्यामध्ये पाठमोरं शरीर असलेला एक तरुण दिसत आहे. त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नाही आहे. या फोटोला तिने छानसं कॅप्शन दिलं आहे. “We Are Engaged”, “आयुष्याचा एका नव्या अध्यायाची एका नव्या व्यक्तीसोबत सुरुवात”.असे कॅप्शन तिने दिले आहे. या फोटोंमध्ये पूजाच्या हातात साखरपुड्याची अंगठी पाहायला मिळत आहे. पूजाने या पोस्टमध्ये तिच्या होणाऱ्या नवऱ्याला टॅग केलेलं नाही याशिवाय एकाही फोटोत अभिनेत्रीने त्याचा चेहरा दाखवलेला नाही. त्यामुळे हा मुलगा नेमका आहे तरी कोण? असा प्रश्न तिच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाला आहे. पण तिचा नवरा परदेशातील एका मोठ्या पदावर काम करत असल्याचा दावा काही जणांनी केला आहे. दरम्यान पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी आणि भूषण प्रधान बरोबरही जोडलं गेलं होतं. पण अभिनेत्रीने साखरपुडा करत त्या चर्चा चुकीचे असल्याचे सिद्ध केले आहे. सध्या अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोवर सध्या मराठी कलाविश्वातील सेलिब्रिटी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. पूजाची सख्खी बहीण रुचिरा सावंतने देखील लाडक्या ताईसाठी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर सायली संजीव, भूषण प्रधान, तेजस्विनी पंडीतसह अनेक कलाकारांनी तिचे अभिनंदन केले आहे.

अभिनेत्री पूजा सावंतने २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘क्षणभर विश्रांती’ या चित्रपटातून मराठी कलाविश्वात पदार्पण केलं. त्यानंतर अल्पावधीतच पूजाने तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांच्या मनावर उमटवली. ‘दगडी चाळ’ चित्रपटामुळे ती घराघरांत लोकप्रिय झाली. तिच्या आगामी चित्रपटाबदद्ल बोलायचे झाल्यास पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’ चित्रपटात ती भूमिका साकारणार असून हा चित्रपट २ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!