Latest Marathi News

बाॅलीवूडची ही अभिनेत्री डीपफेक व्हिडीओची शिकार, व्हिडिओ व्हायरल

अश्लील व्हिडिओ व्हायरल झाल्याने चिंता वाढली, बाॅलीवूड अभिनेत्रींमध्ये भीतीचे वातावरण, पंतप्रधान मोदीही ठरलेत शिकार

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- डीपफेक व्हिडिओने सध्या बाॅलीवूडमधील अभिनेत्रींची झोप उडवली आहे. अनेक अभिनेत्री डीपफेक व्हिडिओची शिकार झालेल्या आहेत. यात रश्मिका मंदाना, कॅटरीना कैफ, काजोल आणि सारा तेंडुलकर यांची नावे आल्यानंतर आता आलिया भट्टचे नाव देखील जोडले गेले आहे. आशियाचा देखील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अभिनेत्रीचा डीपफेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. यात एका तरुणीने निळ्या रंगाच्या फ्लोरल को-ऑर्ड सेट परिधान केल्याचे दिसत आहे. ती कॅमेऱ्याकडे बघून अश्लील हावभाव करताना दिसत आहे. या व्हिडीओतील तरुणीला आलिया भट्टचा चेहरा लावण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून कलाकारांसह फॅन्सनेही चिंता व्यक्त केली आहे. महत्वाचे म्हणजे बॉलिवूड अभिनेत्रीच नाही तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ही एक डिपफेक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये मोदी काही स्त्रियांबरोबर गरबा खेळताना दिसत होते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मोदींनी देखील चिंता व्यक्त केली होती. तसेच अभिनेत्री रश्मिका मंदान्नाचा एक डीपफेक व्हिडिओ इंटरनेटवर समोर आल्यानंतर आणि व्हायरल झाल्यानंतर तिची चिंता व्यक्त केली होती. दरम्यान आलियाच्या चेहऱ्याचा वापर केलेली मुलगी नक्की कोण आहे हे अद्याप समोर आलेलं नाही.

आलिया भट्ट ही सध्याची सर्वाधिक प्रसिद्धी झोतात असलेली अभिनेत्री आहे. पर्सनल आणि प्रोफेशन अशा दोन्ही बाबतीत ती लाईमलाईटमध्ये असते. आलियाचा आगामी ‘जिगरा’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. आलियाच्या आगामी सिनेमांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तसेच तसेच ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमातही ती दिसली होती.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!