Latest Marathi News
Ganesh J GIF

कैद्याने केली पोलिसाची चक्क झाडूने बेदम धुलाई

पोलिसाच्या धुलाईचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, नेमका प्रकार काय?

चंद्रपूर दि २२(प्रतिनिधी)- कैद्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात घेऊन गेलेल्या पोलिसासोबत भयंकर प्रकार घडला आहे. कैद्याला काही कारणाने पोलिसाचा राग आल्याने त्याने रुग्णालयातील झाडू उचलून पोलिसाला चांगलेच झोडपले आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत पोलिसाची सुटका केली.

चंद्रपूर जिल्हा कारागृहात गेल्या अनेक महिन्यांपासून एक कैदी आहे. त्यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले आहे. एके दिवशी कैद्याची प्रकृती खालावली होती. त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र ज्या पोलीस कर्मचाऱ्याने त्याला रुग्णालयात तो पोलीस स्वतः दारूच्या नशेत होता. त्यामुळे कैद्याचे अचानक मानसिक संतुलन बिघडले. त्याने हॉस्पिटलमध्ये पडलेला झाडू उचलला आणि डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसमोर पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. व्हिडीओमध्ये तो पोलिसांना शिवीगाळ करत आहे. तर दुसरीकडे पोलिसांना स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नाही असं दिसंत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयातील कर्मचारी पोलिसाचा बचाव करताना दिसत आहेत.

 

या घटनेमुळे संपूर्ण रुग्णालयात खळबळ उडाली आहे. हाॅस्पीटलच्या कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याने पोलीस बचावला असला तरीही त्याची धुलाई मात्र जोरदार व्हायरल झाली आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटक-यांनी समिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!