‘कार फोडली ही शिक्षा कमीच सदावर्तेंना संपवायला पाहिजे होता’
शिंदे गटाच्या आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य, शिंदे आरक्षणासाठी कटिबद्ध असल्याचा दावा, नेत्यांना गावबंदीचा विरोध
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यामध्ये मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन करत असताना आज वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीची तीन जणांनी तोडफोड केली आहे. दरम्यान तोडफोड करणाऱ्यांना न्यायालयाने जामीन देखील मंजूर केला आहे. पण आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. तसेच त्यांच्या या वक्तव्यामुळे आगामी काळात राज्यात राजकीय धुरळा उडण्याची शक्यता आहे.
मराठा समाज आरक्षणावरून आक्रमक झाला आहे. त्याचेच पडसाद आज सदावर्ते यांची गाडी पकडताना दिसून आले. सदावर्ते यांनीच मराठा आरक्षणाला विरोध करत न्यायालयात आव्हान दिले होते. त्यातच आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले, गुणरत्न सदावर्ते यांच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण हिसकावल गेले आहे. सदावर्तेंनी प्रखरपणे आरक्षणाविरोधातील बाजू कोर्टात मांडली, आणि हे गुणरत्न सदावर्ते जसे सूडाने पेटले होते. यांची जी गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे का? गुणरत्न सदावर्तेंना संपवायला हवं होते, त्यांना संपवले असते तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता. त्यांच्या संपवले असते तर या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की, ते शांततेने आंदोलन करतील. मुख्यमंत्र्यानी दसरा मेळाव्यात लाखो लोकांच्या साक्षीने, शिवरायांच्या समोर शपथ घेऊन सांगितले की, मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. घाईघाईने आरक्षण दिल्यास मोठे नुकसान होईल. प्राण जाए पर वचन ना जाए, अशा प्रवृतीचे मुख्यमंत्री आहेत. सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे. त्याचबरोबर त्यांनी गावागावातून पुढाऱ्यांना होत असलेल्या गावबंदीचा विरोध केला आहे. हा हल्ला कुणी केला माहीत नाही. आमचे आंदोलक असं काही करणार नाही, अशा हल्ल्याचे आम्ही समर्थन करत नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तोडफोड करणारे व्यक्ती हे मराठा क्रांती मोर्चाचे आहे, असा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केला आहे. त्याचबरोबर मनोज जरांगे यांना अटक करा, अशी मागणी देखील सदावर्ते यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा समाज विरूद्ध गुणरत्न सदावर्ते वाद पेटण्याची शक्यता आहे .