बाॅलीवूडच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर दुखापत
अभिनेत्रीच्या दुखापतीचा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल, अभिनेत्रीचा जखम लपवण्याचा प्रयत्न
मुंबई दि २६(प्रतिनिधी)- बाॅलीवूडमध्ये आपल्या चित्रपटांपेक्षा आपल्या फॅशनमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे मलायका अरोरा. मलायका अलीकडे कोणत्याही चित्रपटात दिसत नाही. तरीही ती कायमच चर्चेत असते. पण आता ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण मलायका अरोरा हिच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. त्यामुळे तिचे चाहते कमालीचे चिंतेत आहेत.
अभिनेत्री मलायका अरोरा नुकतीच जिमला जाताना स्पाॅट झाली. यावेळेचा तिचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये मलायकाच्या पायावर एक खूप मोठी काळी खूण दिसत आहे, जे पाहून चाहते अंदाज लावत आहेत की अभिनेत्रीला दुखापत झाली आहे. मलायकादेखील तिच्या पायावरची ही खूण लपवताना दिसली. हा व्हिडीओ वूम्पला या सोशल मीडिया पेजवरून शेअर करण्यात आला आहे. मलायकाच्या या व्हिडिओवर अनेकजण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. विशेष म्हणजे नुकताच मलायकाने तिचा ५० वा वाढदिवसही साजरा केला. यावेळी मलायकाने एक पोस्ट शेअर केली आणि स्वतःला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तसेच चाहत्यांनीही त्यावर प्रतिक्रिया दिल्या होत्या.
मलायकाने नुकतीच ‘झी मराठी उत्सव नात्यांचा अवॉर्ड २०२३’ ला उपस्थिती दर्शवली. यावेळी मलायका अरोरा “ऐका दाजीबा!” गाण्यावर परफॉर्मन्स करताना दिसली. तसेच ती श्रेया बुगडेबरोबर स्टेजवर लाडू वळताना दिसली. तिचा हा व्हिडिओ देखील जोरदार व्हायरल झाला होता.