
उत्तराखंड बोर्ड ऑफ स्कूल एज्युकेशनने (UBSE) 10वी बोर्डाचा निकाल जाहीर शनिवारी (25 एप्रिल) लागला आहे. पण इकडे महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल कधी लागणार याच्या प्रतीक्षेत विद्यार्थी आणि पालक आहेत.

दहावी, बारावीच्या निकालाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. यंदा निकाल उशिरा लागण्याची शक्यता आहे. बोर्डाच्या कर्मचारी आंदोलनाचा फटका दहावी, बारावीच्या निकालाला बसण्याची शक्यता आहे. 28 एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांचा कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

शिक्षण मंडळाची बढती आणि बदली 2 वर्षांवरुन 4 ते 6 वर्षांवर नेल्याने कर्मचारी संतप्त असल्याने महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आंदोलनावर तोडगा न निघाल्यास निकालाचं काम रखडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


