Latest Marathi News
Ganesh J GIF

दौंड बनतंय अंमली पदार्थांचे हब? १३ लाखांच्या गांजा तस्करीमुळे सुरक्षेच्या चिंधड्या.

दौंड येथील रेल्वे उड्डाणपुलाजवळ पोलिसांनी कारवाई करत तब्बल ५२ किलो गांजा जप्त केला असून, १३ लाख रुपयांचा हा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी मध्य प्रदेशातील मुकेश कणोजे (वय ३६) याला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.

पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून अहिल्यानगरकडून साताऱ्याकडे गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रेल्वे उड्डाणपुलाजवळ सापळा रचला. संबंधित कार येताच तिला अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, चालकाने पोलिसांचा घेराव तोडून पळण्याचा प्रयत्न केला आणि पुढे जाताना एका चारचाकी वाहनाला धडक दिली.

पोलिसांनी तत्परता दाखवत पाठलाग करून कार पकडली आणि चालकाला ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केली असता गांजाचे गठ्ठे आढळून आले. पोलिसांनी गांजा, कार आणि आरोपी ताब्यात घेतला आहे. ही कारवाई ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल, अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गोपाळ पवार, उपनिरीक्षक रूपेश कदम व पथकाने केली.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!