गणेश उत्सवात शिंदे गट ठाकरे गटाला देणारा जोरदार धक्का
उद्धव ठाकरेंना धक्का देण्यासाठी 'यांना' घालणार गळ
मुंबई दि २६ (प्रतिनिधी)- शिवसेना कोणाची? हा प्रश्न सध्या तरी न्यायालयात प्रलंबित आहे. पण शिंदे आणि ठाकरेंकडून शिवसेना आमचीच हा दावा सातत्याने केला जात आहे. पण शिंदेंनी ठाकरेंना अडचणीत आणण्यासाठी मोठी खेळी खेळत आहेत. त्यामुळे ठाकरेंची डोकेदुखी वाढली आहे.
सर्वोच्च न्यायालयात हा प्रश्न प्रलंबित असतानाच शिंदे गट ठाकरेंना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीचं नियोजनही त्यांनी सुरू केले आहे. त्यासाठी गणेश उत्सवात नवी खेळी खेळली जाणार आहे. गणेशोत्सवाच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाला धक्का देण्याचं नियोजन शिंदे गट करत आहे. ठाकरेंचे कार्यकर्ते फोडण्याच्या प्रयत्नात शिंदे गट आहे. त्यासाठी मुंबईतल्या शिवसेनेला अनुकूल असणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना लाखोंच्या जाहिरातींच्या ऑफर दिल्या जात आहेत. त्या बदल्यात शिंदे गटाला पाठिंबा देण्याची अट ठेवण्यात आली आहे. ठाकरेंचे समर्थक असलेल्या मंडळांना शिंदे गटाकडून संपर्क साधण्यात येत आहे. त्यांना जाहिरातींच्या आॅफर दिल्या जात आहेत.
सत्ता संघर्षाच्या काळात तळागाळातल्या, ग्राऊंड लेव्हलवर काम करणारे कार्यकर्ते फुटल्यास ठाकरेंना धक्का बसण्याची शक्यता आहे. दीड लाख शपथपत्रे निवडणूक आयोगाकडे जमा करत बाजी मारली आहे.