Latest Marathi News
Ganesh J GIF

शाळेत जाण्यासाठी निघालेल्या बहिणी शाळेत पोहोचल्याच नाहीत

कदमवाक वस्तीतील दोन सख्या बहिणींवर काळाची झडप

पुणे दि २०(प्रतिनिधी)- भरधाव ट्रकच्या धडकेने शाळकरी मुलींचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोर परिसरात सकाळी घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोघी सख्या बहिणी आहेत. शाळेत जात असतानाच या सख्या बहिणींचा मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी ट्रकचालकाला पोलिसांनी अटक केली.

छकुली कुमार शितोळे (वय १७), राजश्री कुमार शितोळे (वय १०) अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी ट्रकचालक परशुराम सुकेशवार महतो याला अटक करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार लोणी काळभोर परिसरातील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कुलमध्ये छकुली अकरावीत शिकत होती. तिची लहान बहीण राजश्री सहावीत शिकत होती. दुचाकीस्वार छकुली आणि तिची लहान बहीण राजश्री सकाळी सातच्या सुमारास शाळेत जात होत्या. त्या वेळी लोणी रेल्वे स्थानक चौकात भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. अपघातात दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.उपचारांपूर्वीच दोघींचा मृत्यू झाला. पोलीसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस करत आहेत. एकाच कुटुंबातील दोन सख्या बहीणींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!