Latest Marathi News

स्टार अभिनेत्री या दिवशी जाहीर करणार तिच्या लग्नाची तारीख

इन्स्टापोस्टमुळे चर्चेला उधान, जोडीदाराला म्हणते आता गुपित अजून...

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- बॉलिवूड मोस्ट फेव्हरेट कपल अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून रंगल्या आहेत. कियारा-सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण कियाराने केलेल्या एका पोस्टमुळे लवकरच ते लग्नाची तारीख जाहीर करणार असल्याची चर्चा बी टाउनमध्ये रंगली आहे.

कियारा आणि सिद्धार्थ लवकरच त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करणार असल्याचे बोललं जात आहे. कारण कियाराने नुकताच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने २ डिसेंबरचा उल्लेख केल्यामुळे ती २ डिसेंबरला त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. व्हिडीओ पोस्ट करताना तिने लिहिलं, “गुपित अजून ताणून धरू शकत नाही. २ डिसेंबरची वाट पहा.” कियाराचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे. तिचे गुपित म्हणजे तिच्या आणि सिद्धार्थच्या लग्नाची तारीख असल्याचे बोलले जात आहे. कियारा आणि सिद्धार्थ लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा या पोस्टमुळे पुन्हा सुरु झाल्या आहेत.

‘कॉफी विथ करण’च्या एपिसोडमध्ये शाहिद कपूरने त्यांच्या लग्नाची हिंट दिली होती. तो म्हणाला होता की, “या वर्षाच्या अखेरीस एका मोठ्या घोषणासाठी तयार राहा आणि ही घोषणा कुठल्याही चित्रपटाची नाही.” त्यामुळे २ डिसेंबर ही तारीख दोघांच्या लग्नाची तारीख जाहीर करण्याचा महुर्त असल्याची चर्चा रंगली आहे. कियारा आणि सिद्धार्थ अनेकवर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर आता लवकरच ते विवाह बंधनात अडकणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!