Latest Marathi News
Ganesh J GIF

‘तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला’

आरटीओ अधिकारी अजित शिंदेना रिक्षा चालकांचा दंडवत, व्हिडिओ व्हायरल

पुणे दि २९(प्रतिनिधी)- पुण्यात बेकायदा बाईक टॅक्सी चालकांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुण्यात सोमवारी ‘बघतोय रिक्षावाला’ या संघटनेच्या वतीने बेमुदत बंदची हाक देण्यात आली होती. अखेर पालकमंत्र्याच्या मध्यस्थी नंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.या आंदोलनादरम्यान आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांना भेटण्यासाठी गेलेल्या रिक्षा चालकांनी शिंदे यांना ‘फेकू अधिकारी’ म्हणत साष्टांग दंडवत घातला. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आक्रमक झालेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील रिक्षा चालकांनी सोमवारी मोठ्या संख्येने रिक्षा चालकांनी आरटीओ कार्यालयाबाहेर एकत्र येत आंदोलन केले. पोलीस अधिकाऱ्यांनी आरटीओ आणि रिक्षा संघटनांमध्ये मध्यस्थी करत चर्चा केली. आरटीओ अधिकारी अजित शिंदे यांच्याकडून पुन्हा तीच तीच आश्वासन दिली जात असल्याचे पाहून रिक्षा चालकांनी शिंदे यांना ‘फेकू अधिकारी’ म्हणत साष्टांग दंडवत घातला. तुमच्यासारखा फेकू अधिकारी पुणे जिल्ह्याला लाभला, तुमच्यासह प्रशासनाचा धिक्कार असो. तुमच्या या फेकुगिरीला आणि बोलबच्चन गिरीला आम्ही कंटाळलो आहोत. प्रत्येक वेळी तुम्ही कारवाई करण्याचे आश्वासन देता मात्र दिलेला शब्द पाळत नाहीत असे म्हणत या रिक्षा चालकांनी आणि रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी आरटीओ अजित शिंदे यांना दंडवट घातला.

पुण्यासह पिंपरी चिंचवड मध्ये करण्यात आलेला रिक्षा चालकांचा संप सोमवारी संध्याकाळी मागे घेतला. बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन होणार असल्याचे हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांनी सांगितल्या नंतर रिक्षा चालकांनी आपला संप मागे घेतला.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!