Just another WordPress site

पालघरच्या कचेरी रोडवर आहे भुताचा वावार?

भुताचा व्हिडिओ व्हायरल, नागरिकांची पोलीसांकडे ही मागणी

पालघर दि ३०(प्रतिनिधी)- पालघरमध्ये छतावर भूत असल्याचा सीसीटीव्हीचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. रस्त्यालगत फुटपाथ वर झोपलेला तरुण, वारंवार हवेत उडणारी खुर्ची, कोणीही बसलेलं नसतानाही आपोआप चालणारी सायकल आणि छतावर सफेद पोशाख परिधान करून वारंवार हालचाल करणारी महिला असा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून या व्हायरल व्हिडिओतून भूत असल्याचं भासवण्यात येत आहे. मात्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीकडून हे सर्व दावे खोडून काढण्यात आले आहेत. काही तरुणांनी हा खोडसाळपणा असल्याचे समोर आले आहे.

पालघरमध्ये मागील काही दिवसापासून कचेरी रोड परिसरात भूत असल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. रस्त्यालगत फुटपाथवर झोपलेला तरुण, अचानक छतावर पांढरे कपडे परिधान केलेले तरुणी, हवेत उडणारी खुर्ची आणि कोणीही बसलेले नसताना चालणारी सायकल अशी दृश्य असलेला व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. मात्र अंधश्रद्ध निर्मूलन समितीकडून हे सर्व दावे खोडून काढण्यात आली असून हा तरुणांनी केलेला खोडसाळपणा असल्याचं सांगितलं आहे. व्हिडिओत रात्री रस्त्यालगत झोपलेला तरुण त्याच्या पोशाखावरुन सुशिक्षित आणि आर्थिक सक्षम वाटतो. तर व्हिडिओच्या शेवटी झोपलेल्या तरुणाच्या अंगावर अचानक चादर गुंडाळली जाते. या सगळ्यामुळे भीती निर्माण झाल्याने पळून जाणारा तरुण हा निव्वळ देखावा करत असल्याच स्पष्ट होत असे सांगण्यात येत आहे.नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

GIF Advt

पालघरमधील म्हणून व्हायरल होणारा व्हिडिओ कुठला आहे याची अजूनही कुठलीही स्पष्टता झाली नसली तरी काही खोडसाळ तरुणांनी मनोरंजनाच्या दृष्टीने हा सीसीटीव्ही व्हिडिओ तयार केल्याचा दावा करण्यात येत असल्याने पालघर पोलिसांनी याची चौकशी करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!