Latest Marathi News
Ganesh J GIF

या अभिनेत्रीचा व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल

व्हिडिओ पाहून तुम्हीही प्रेमात पडाल, एकदा बघाच काय म्हणतेय अभिनेत्री...

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठीमधील आघाडीची अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर सक्रिय असते. प्राजक्ता आपल्या फिटनेसबाबत खुपच जागरुक असते. व्यायाम करतानाचे काही व्हिडीओदेखील ती इन्स्टाग्राम शेअर करत असते. आतादेखील तिने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये प्राजक्ता योगासन करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओचं नेटकरी कौतुक करत आहेत. तसेच तिच्या सुंदरतेबाबतही ते कमेंट करत आहेत.

प्राजक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती ‘बकासन’ हा योग प्रकार करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना तिने म्हटलं की, “बकासन…याआधीही हे आसन करताना तुम्ही मला पाहिलंय. पण १२ आकडे मोजेपर्यंत आसन करणं आता जमायला लागलं आहे.” या व्हिडीओमध्ये प्राजक्ताची योग करण्यासाठी लागणारी लवचिकता दिसून येते.योगासनांची प्राजक्ताला प्रचंड आवड आहे. काही मुलाखतींमध्ये तिने याबाबत उल्लेखही केला आहे. खूप छान, उत्तम फिटनेस, तसेच सुंदरतेचे रहस्य, अशा अनेक कमेंट तिचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी केल्या आहेत.

योग आणि प्राणायम यामुळे तुमच्या दिवसाची सुरुवात उत्तम होते आणि तुम्ही निरोगी राहता हे प्राजक्ता नेहमी सांगते. प्राजक्ता स्वतः या सगळ्या गोष्टी फॉलो करत असते. योग आणि प्राणायमच तिच्या फिटनेसचं रहस्य आहे.योगासनांचे विविध प्रकारही प्राजक्ता अगदी परफेक्ट करताना दिसली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!