Just another WordPress site

प्रियकराच्या मदतीने पत्नीने केला पतीचा खून

अनैतिक संबंधात अडथळा ठरले कारण, आत्महत्येचा बनाव फसला

अकोला दि ११(प्रतिनिधी)- अकोला जिल्ह्यात बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीबाबत पोलिसांनी खळबळजनक खुलासा केला आहे. बेपत्ता झालेल्या या व्यक्तीच्‍या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने हत्या करत मृतदेह विहिरीत फेकून दिल्‍याची धक्‍कादायक घटना समोर आली आहे.

GIF Advt

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक बंडू डाखोरे त्यांची पत्नी मीरा बंडू डाखोरे हिचे गजानन शेरू बावणे या व्यक्तीसोबत प्रेम संबंध होते. या प्रेमाचे कुणकुण तिच्या पतीला म्हणजेच बंडूला लागली. त्यातून दोघे पती-पत्नीचे सतत वाद व्हायचे, अखेर पत्नीने पतीचा काटा काढण्याचा निश्चित केलं. गजानन बावणे आणि मृतक बंडू यांची मैत्री असून चांगले संबंध होते. गजाननचे बंडूच्या घरी नेहमी ये-जा राहायचे. त्यातून मीरा आणि गजानन प्रेम सबंध जुळले. दरम्यान, गजानन आणि बंडू हे दोघेही हत्येच्या दिवशी सोबत दारू पिण्यासाठी शेतात बसले, त्यानंतर गजाननने दुपट्ट्याच्या साह्याने बंडूचा गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने आत्महत्या केली असावी असं दर्शवून आत्महत्याचा बनाव रचला. त्यानंतर ज्या शेतात त्यांची पार्टी सुरू होती, त्याच शेजारील शेतातील विहिरीत बंडू यांचा मृतदेह फरफटत नेऊन विहीरित फेकून दिला. हत्येनंतर मृतक बंडूच्या पत्नीने म्हणजेच पातुर पोलिसात पती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना शेजारील विहिरीत बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर हे सर्व आत्महत्या बनाव रचून हत्येचा केल्याचे प्रकरण उघडे झाले.

शाम खुळे यांच्या कार्ला शिवारातील शेतात बंडू आत्माराम डाखोरे हे काम करीत असून तिथेच रखवालदार म्हणून राहत होते. पण पत्नी आणि तिच्या प्रियकराने त्यांचा खून केला. दरम्यान मारेकरी पत्नी आणि तिचा प्रियकर गजानन बावणे हे पातूर पोलीसांच्या ताब्यात आहे. याप्रकरणी अधिक तपास पातूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हरीश गवळी करीत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!