Just another WordPress site

लग्नसोहळ्यात महिलेने केला धमाकेदार भन्नाट डान्स

सोशल मिडीयावर डान्स व्हिडिओचा धूमाकूळ, एकदा बघाच

मुंबई दि ११(प्रतिनिधी)- सोशल मिडीयावर सध्या एका महिलेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. साडी नेसून एका महिलेने केलेला भन्नाट डान्स पाहून नेटकरी मोहित झाले आहेत. ‘तेरी आंख्या का ओ काजल” या गाण्यावर महिलेने केलेला डान्स अनेकांच्या पसंतीत उतरला आहे. सोशल मिडीयावर हा डान्स व्हायरल होत आहे.

GIF Advt

सपना चौधरीच्या तेरी आंख्या का ओ काजल गाण्यावर या महिलेनं जबरदस्त एनर्जीत डान्स केला आहे. Shraddha temre katre नावाच्या युजरने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. महिलेने तिच्या स्टाईलने गाण्यावर ठुमके लगावता मनसोक्त डान्स केला आहे. एका हळदीच्या कार्यक्रमातील हा व्हिडीओ असुन ही महिला डान्स करत असताना सर्वजन उत्सुक होत तिचा डान्स पाहत आहेत शिवाय टाळ्या वाजवत ते या डान्सला दाद सुद्धा देत आहेत. महिलाही डान्स करण्यात दंग झालेली या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडीओ प्रचंड गाजला असून आतापर्यंत जवळपास १ लाखांहून अधिक जणांनी लाईक केलं आहे. तसंच नेटकऱ्यांनी या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

या महिलेच्या डान्सपुढे सपना चौधरीही फेल आहे, असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. संगीत म्हणजे स्वत:ला विसरण्याचा मार्ग आहे, असंही एका नेटकऱ्यानं प्रतिक्रिया देऊन म्हटलं आहे. सध्या ही महिला सोशल मिडीयावर धूमाकूळ घालताना दिसत आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!