Latest Marathi News
Ganesh J GIF

माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी या चित्रपटात झळकणार प्रमुख भुमिकेत

मराठमोळा अभिनेत्री असणार प्रमुख अभिनेत्री, तब्बल सात भाषेत चित्रपट प्रदर्शित होणार, माजी मिसेस मुख्यमंत्री पॅन इंडिया चित्रपटात

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता श्रेयस तळपदे पुन्हा एकदा एका हिंदी चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांची पूर्व पत्नी आणि कन्नड अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

अभिनेतस श्रेयस तळपदे ‘अजाग्रत’ या त्याच्या आगामी पॅन इंडिया चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटात श्रेयस तळपदे हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. त्याच्याबरोबर या चित्रपटात कर्नाटकाचे माजी मुख्यमंत्री यांची पत्नी आणि कन्नडची अभिनेत्री राधिका कुमारस्वामी प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. ‘अंधारामागील सावल्या’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन असून या कथानक अनपेक्षिरित्या उलगडणार आहे. सात वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रदर्शित होणारा त्याचा हा श्रेयसचा आणि राधिकाचा पहिला पॅन इंडिया चित्रपट असणार आहे. या शिवाय या चित्रपटात आणखी एक अभिनेत्री दिसणार आहे. पण तिचे नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. या व्यतिरिक्त ‘अजाग्रत’मध्ये सुनील, राव रमेश, जगपती बाबू, आदिथ्य मेनन, देवराज, अच्युत कुमार, साई कुमार, समुद्र कानी, मोहन लाल यांच्यासह अन्य कलाकार असणार आहेत. या चित्रपटातील अभिनेत्री असलेली राधिका कुमारस्वामीने अनेक कन्नड चित्रपटात काम केले आहे. २००२ मध्ये राधिकाने कन्नड चित्रपटसृष्टीतून अभिनयाला सुरुवात केली. २००५ मध्ये ती एकावेळी ५ कन्नड चित्रपटांमध्ये दिसली होती. हे पाच चित्रपट अपयशी ठरले. त्यानंतर तिने तामिळ चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. महत्वाचे म्हणजे राधिका संपत्तीच्या बाबतीत आपले पती आणि माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी पेक्षा श्रीमंत आहे. निवडणुक. प्रतिज्ञापत्रानुसार राधिकाच्या नावावर १२४ कोटींची संपत्ती आहे. कुमारस्वामींजवळ एकूण ४४ कोटींची संपत्ती आहे.

कुमारस्वामी आणि त्यांची पत्नी राधिका यांच्यात २७ वर्षाचे अंतर आहे. कुमारस्वामी आणि राधिका यांची २००५ साली पहिल्यांदा भेट झाली होती. तर २०१० मध्ये राधिका आणि कुमारस्वामी यांचे लग्न झाले होते. राधिका कुमारस्वामी यांनी आतापर्यंत ३३ चित्रपटात काम केले आहे. राधिका सध्या कन्नड चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री तर आहेतच शिवाय निर्मात्याही आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!