Latest Marathi News
Ganesh J GIF

पती सोबत वाद झाल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

दोन मुलासह आईची विष प्राशन करत आत्महत्या, या कारणामुळे झाला वाद, हळहळ व्यक्त

यवतमाळ दि १७(प्रतिनिधी)- एका जन्मदात्या आईने आपल्या दोन चिमूकल्यांना विषारी औषध पाजून स्वत:चंही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे. या धक्कादायक घटनेत आईसह दोन मुलांना आपला प्राण गमवावा लागला आहे. या घटनेनंतर यवतमाळ जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. महिलेला मानसिक आणि शारिरिक त्रास दिला जात असल्याने तिने आत्महत्या केली आहे.

रेशमा नितीन मुडे, श्रावणी नितीन मुडे आणि सार्थक उर्फ निहाल नितीन मुडे अशी मृतकांची नावे आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील निंगनूर येथे ही घटना घडली आहे. माहेरवरून पैसे आणण्यासाठी पती सतत त्रास देत असल्याने महिलेने हे धक्कादायक पाऊल उचलले. मिळालेल्या माहितीनुसार महागाव तालुक्यातील धानमुख येथील वसंत टीकाराम राठोड यांच्या मुलीचा विवाह नितीन मुडे यांच्याबरोबर झाला होता. सुरुवातीला त्यांचा संसार सुरळीत सुरू होता. त्यांना दोन मुले झाली. पण, नंतर नितीनला दारूचे व्यसन लागले. माहेरवरून पैसे आणण्यासाठी रेशमाचा मानसिक आणि शारीरिक छळ सुरू केला. उपाशी ठेवणे आणि शिवीगाळ करत मारहाण करणे असे प्रकार सुरु झाले होते. घटनेच्या दिवशीही दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर रेशमाने आपल्या दोन्ही मुलांना विष पाजले आणि स्वत:ही विष प्राशन केले. शेजाऱ्यांना ही बाब लक्षात येताच त्यांनी तातडीने सवना येथे शासकीय रुग्णालयात हलविले. त्याठिकाणी रेशमा आणि श्रावणी यांचा मृत्यू झाला. तर मुलगा गंभीर असल्याने त्याला पुसद येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले होते. पण त्याचाही त्याठिकाणी मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेशमाच्या वडिलांनी रुग्णालयात धाव घेतली. मंगळवारी वडील वसंत राठोड यांनी बिटरगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या घटनेने सगळीकडे हळहळ व्यक्त होत आहे.

बिटरगाव पोलिसांनी महिलेचा पती नितीन किसन मुडे आणि सासरा किसन हेमाला मुडे या दोघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ही घटना घडल्यामुळे गावातील सर्वजण हळहळ व्यक्त करत आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!