Latest Marathi News
Ganesh J GIF

छोट्या बहिणीची छेड काढणाऱ्या तरुणाची मोठ्या बहिणीने केली धुलाई

बेल्टने धुलाई करत उतरवली रोड रोमिओची मस्ती, व्हिडिओ जोरदार व्हायरल, पोलिसात तक्रार दाखल

अहमदाबाद दि २५(प्रतिनिधी)- बहिणीची छेड काढणाऱ्या रोड रोमिओची मोठ्या बहिणीने भर रस्त्यत चांगलीच धुलाई केली. या धुलाईचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला असून तरूणीचे सर्वांनी काैतुक केले आहे. घडलेली घटना गुजरातमधील आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शाळेत जाणाऱ्या एका मुलीची एक तरुण सतत छेड काढत होता. आदल्या दिवशी मुलगी सायकलवरून शाळेत जात असताना विजय सरकटे या तरूणाने त्या मुलीला थांबवत एक भेट देण्याचा प्रयत्न केला. भेट घ्यावी यासाठी तो जबरदस्ती करत होता. मुलीने भेट घेण्यास नकार दिल्यानंतर त्याने जबरदस्तीने ते गिफ्ट तिच्या बॅगेत टाकत तिच्याशी गैरवर्तन केले. हा प्रकार घरी सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिची बहीणही सोबत आली. पण ती तिच्यापासून काही अंतरावर थांबली होती. तो तरुण परत त्या मुलीची छेड काढू लागताच तिची बहिण तिथे आली आणि तिने अक्षरशः पट्ट्याने त्या तरुणाची भर रस्त्यात धुलाई केली. त्यावेळी तरूण फक्त तोंड लपवता दिसला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे.

मुलींच्या पालकांनी याप्रकरणी पोलिसातही तक्रार दाखल केली. मुलींच्या छेडछाडीची कितीतरी प्रकरणं समोर येतात. पण या मुलींनी केलेल्या धाडसाचे अनेकांनी काैतुक केले आहे. तर अशा रोड रोमिओवर कारवाईची मागणी केली आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!