…तेंव्हा एकनाथ शिंदे काॅंग्रेसमध्ये जाणार होते
शिवसेनेच्या 'या' वरिष्ठ नेत्याचा मोठा गाैप्यस्फोट, रामदास कदमांवरही आरोप
मुंबई दि २६(प्रतिनिधी) – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचे काम रामदास कदम आणि एकनाथ शिंदे करत आहेत. जितका तुम्ही त्रास द्याल, तितकी शिवसेना पेटून उठेल आणि शिवसेनेला सहानुभुती मिळत राहील असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे. यावेळी त्यांनी एक मोठा गाैप्यस्फोट केला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले की, एकनाथ शिंदे काॅंग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा शिंदे त्यांच्याकडे गेले. पृथ्वीराज चव्हांणानी त्यांना अहमद पटेलांना भेटण्यास सांगितले. शिंदेंनी प्रयत्न केला, पण पुढे काही झालं नाही. रामदास कदम हे देखील राष्ट्रवादीत जाणार होते, पण बाळासाहेबांनी त्यांना रोखले. आता हेच दोघे मांडीला मांडी लावून बसले आहेत. असा गाैप्यस्फोट चंद्रकांत खैरे यांनी केला. शिंदेना ठाकरेंनी ओळख दिली.उद्धव ठाकरेंनी शिंदेंना युती काळात मंत्री केले, आधी ते उद्धव ठाकरेंचा आदेश मानायचे.पण,आता शिवसेनाच फोडायला निघाले आहेत. पण अगोदर राज्यात असणारी शिवसेना उद्धव ठाकरेंनी देशभरात विस्तारीत केली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंचीच शिवसेना खरी आहे,असा दावा देखील खैरे यांनी केला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात राजकीय संघर्ष सुरू आहे. शिवसेना नेमकी कुणाची यावरून न्यायालयाबरोबरच राज्यात शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यात जोरदार संघर्ष सुरू आहे. त्यामुळे सध्या एकमेकांवर संधी मिळेल तेंव्हा आरोप प्रत्यारोप केले जात आहेत.