अमरावती दि २२(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवलेले आणि आता राष्ट्रवादी प्रवेश केलेले आमदार देवेंद्र भुयार यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.त्यांनी केलेल्या विधानामुळे चर्चा होत आहे. यामुळे विरोधक त्यांना लक्ष्य करण्याची शक्यता आहे.
आमदार भुयार यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना काही झालं तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, असे विधान केले आहे. त्याचबरोबर मुंबईच्या ठाकरेंची दहशत कालही होती आणि आजही आहे. आमच्या नादाला लागायचे नाही. हर्षवर्धन दादांच्या नादाला बिलकूल लागू नका. शिवाजी संस्थेच्या निवडणुकीमध्ये मला जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही कार्यकर्त्याला धक्का लावण्याचे काम केले, तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा, असा इशाराच भुयार यांनी दिला. त्यामुळे स्थानिक राजकारणातही त्याचे पडसाद उमटले आहेत.
देवेंद्र भुयार राजु शेट्टी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात होते. पण राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीबरोबर फारकत घेतल्यानंतर भोयर यांनी मात्र शेट्टीची साथ सोडत अजित पवारांना साथ दिली.तसेच राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीतही ते चर्चेत आले होते. आता विरोधकांना इशारा दिल्यामुळे ते चर्चेत आले आहेत.