मंत्रिपदाचे आमिष दाखवून या भाजप आमदारांना कोट्यवधींचा गंडा
मंत्रीपदाचे अमिष दाखवून उकळले १ कोटी ६६ लाख, आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल आल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारचा रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पण आता मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रीपदाचे आमिष दाखवत राज्यातील आमदारांना चक्क लाखोंचा गंडा घालण्यात आल्याचे समोर आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे.
नीरजसिंग राठोड असे या भामट्याचे नाव आहे. त्याने मंत्रिपदाचे आमिष दाखवणाऱ्या व्यक्तीने आपण भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचे स्वीय सहायक असल्याचे सांगितले. त्यामुळे मंत्रिमंडळात तुम्हाला नक्की स्थान मिळवून देतो असे सांगून त्याने आमदारांकडून १ कोटी ६६ लाख रुपये घेतले. राठोडने भाजपचे आमदार विकास कुंभारे, आ. सावरकर, आ. तानाजी मुरकुटे, नारायण कुचे यांना पैशाची मागणी केली. त्याशिवाय अन्य आमदारानांही त्याने मंत्रीपदाची अमिष दाखवले. काही आमदारांना नीरजसिंगचा डाव कळला होता. त्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर पोलिसांनी नीरजसिंगला बेड्या ठोकल्या आहेत. त्याला गुरजारतमधील मोरबीमधून अटक करण्यात आली आहे. भाजपचे मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना ७ मे रोजी एक कॉल आला होता. त्यांना नीरजसिंह राठोड या भामड्याने मंत्रीपदाचे आमिष दाखवून पैशांची मागणी केली. मात्र विकास कुंभारे यांना संशय आला. त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना या फोन कॉलची माहिती दिली. त्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले आहे. आता पैशाच्या बदल्यात मंत्रिपद, आमदारांची फसवणूक झाल्याचे समोर आल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
याआधीही शिंदे फडणवीस सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात पुणे जिल्हयातील दौंडचे आमदार राहुल कुल यांना एका अनोळखी इसमाने फोन करुन भाजपच्या मोठ्या माणसाच्या संर्पकात मी असून महाराष्ट्र शासनाच्या नवीन मंत्रीमंडळात मंत्रीपद मिळविण्याकरिता १०० कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यावेळी कुल यांनी पोलिसांना याची कल्पना दिल्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती.