Latest Marathi News
Ganesh J GIF

सैराटमधील आर्चीचा तो व्हिडिओ जोरदार व्हायरल

रिंकू राजगुरूच्या व्हिडीओवर चाहते फिदा, म्हणाले वा आर्चे तु तर क्वीनच...

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- सैराट चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुने स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटांसह वेबसिरिजमध्ये देखील काम केले आहे. आता तिने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, जो पाहून तिचे चाहते पुन्हा एकदा सैराट झाले आहेत.

‘सैराट’ चित्रपटामध्ये रिंकू बुलेट आणि ट्रॅक्टर चालवताना दिसली. तिची ही स्टाईल अनेकांना आवडली होती. त्यानंतर मुलींनी बुलेटीन चालवायची एक फॅशनच आली होती. आता आर्चीने शेअर केलेल्या व्हिडिओत ती कार चालवताना दिसत आहे. जरीची साडी नेसून, अंगावर पारंपरिक दागिने परिधान करून ती अत्यंत कार चालवीत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करीत तिने “डेस्टिनेशन न ठरवताच लॉंग ड्राइव्हला जाऊया.” असे कॅप्शन दिले आहे. रिंकूने पोस्ट केलेल्या व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काहीजण रिंकीच्या ड्रायविंगचे कौतुक करत आहेत. तर एका नेटकाऱ्याने, सैराट मधी ट्रॅक्टर चालवायची बुलेट पण चालवायची आणि आत्ता फोर व्हिलर वा आर्चे, अशी कमेंट केली आहे. तर काही नेटकऱ्यांनी तिला सीटबेल्ट वापरण्याचा सल्ला देखील दिला आहे. तर एका नेटकऱ्याने कमेंट करत “बुलेट, ट्रॅक्टर, कार.आता फक्त विमान चालवायचं राहिलंय.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “अकलूजची क्वीन.” अश्या हटके कमेंट केल्या आहेत. रिंकूचे सर्वच फोटो किंवा व्हिडिओ सोशल मिडीयावर भाव खावून जात असतात. त्यामुळे हा व्हिडिओही चाहत्यांच्या पसंतीस उतरल्यास दिसत आहे.

सैराट या चित्रपटाला यावर्षी ७ वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही रिंकू राजगुरुला आर्ची याच नावाने ओळखले जाते. दरम्यान रिंकू लवकरच खिल्लार या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये रिंकू आणि ललित प्रभाकर पहिल्यांदा स्क्रिन शेअर करणार आहेत. तर मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!