Latest Marathi News
Ganesh J GIF

शिंदे गटाच्या आमदाराच्या घरावर चोरट्यांनी केला हात साफ

सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या घरावर चोरट्यांचा डल्ला, आमदाराच्या शेतातील ट्रॅक्टर चोरीला

छ. संभाजीनगर दि ८(प्रतिनिधी)- आजवर चोरीच्या अनेक घटना आपण वाचल्या आहेत, पाहिल्या आहेत. पण आपल्या सुरक्षेसाठी ज्यांना आपण निवडून देतो त्या लोकप्रतिनिधींच्या घरी चोरी झाली तर त्याची मात्र जोरदार चर्चा होत असते. मात्र इथं तर चक्क एका सत्ताधारी आमदाराच्या घरावर चोरट्याने हात साफ केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाट यांच्या घरावर चक्क चोरट्यांनी हात साफ केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार आमदार संजय शिरसाट यांच्या मुलीच्या नावावर असलेला महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टरच चोरी गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अज्ञात चोरट्यांनी सातारा परिसरातील गट क्रमांक ९२ मधून पाच लाख रुपये किंमतीची, शिरसाट यांच्या मुलीच्या नावावर असलेली ट्रॅक्टर-ट्रॉली चोरून नेले आहे. या प्रकरणी शिरसाट यांचे पुत्र माजी नगरसेवक सिद्धांत शिरसाट यांच्या फिर्यादीवरून सातारा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सिद्धांत संजय शिरसाठ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मे रोजी रात्रीच्या सुमारास सातारा परिसरातील तंत्रनगर येथे त्यांच्या बहिणीच्या नावे असलेला महिंद्रा ट्रॅक्टर कोणेतरी अज्ञात व्यक्तीने चोरून नेला. अंदाजे पाच लाख रुपये किमतीची ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरून नेल्याचं तक्रारीत म्हटले आहे. सदर ट्रॅक्टर हा सिद्धांत यांच्या बहिणीच्या नावावर असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चाबूकस्वार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार धुळे हे करत आहेत. आता आमदार शिरसाट यांचा ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या चोरांना पकडण्याचे पोलिसांसमोर देखील आव्हान असणार आहे.

संभाजीनगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून शहर आणि ग्रामीण भागात चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. मात्र चोरांनी थेट आमदार शिरसाट यांचाच ट्रॅक्टर चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. जर आमदारच सुरक्षित नसतील तर सर्व सामन्य लोकांचे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.पोलिसांकडून चोरांचा शोध घेतला जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!