Latest Marathi News
Ganesh J GIF

‘भाजपचा शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता’

सामनातून मोठा गाैप्यस्फोट, शरद पवारही जोरदार टिका, महाविकास आघाडी तुटणार?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी भक्कम असल्याचा दावा करण्यात येत असला तरीही तीन पक्षातील असमन्वय सातत्याने समोर येत आहे. आता सामनातुन राष्ट्रवादीतील शरद पवारांच्या राजीनाम्यावरुन हल्लाबोल करण्यात आला आहे. त्याचबरोबर शिवसेने प्रमाणेच राष्ट्रवादीही फोडण्याचा भाजपाचा प्रयत्न होता असा गाैप्यस्फोट करण्यात आला आहे. त्यामुळे आघाडीतील बेबनाव समोर आला असून वाद निर्माण झाला आहे.

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका करण्यात आली आहे. एवढच नाहीतर सामनातून राष्ट्रवादीबाबत एक गाैप्यस्फोट करण्यात आला आहे. भाजपचा शिवसेना फोडली त्याप्रमाणे राष्ट्रवादी फोडण्याचाही प्लॅन होता. राष्ट्रवादीचे लोक लोक बॅगा भरून तयार होते. राष्ट्रवादीतील लोक पोडल्यानंतर त्या लोकांच्या लॉजिंग-बोर्डिंगची व्यवस्था देखील भाजपने केली होती. मात्र पावरांच्या खेळीने भाजपचा प्लॅन केरात गेला. तर पवारांनी पक्ष भाजपच्या तंबूत न्यावा आणि आपल्या सहकाऱ्यांची ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्समधून सुटका करावी असा एका गटाचा आग्रह होता. पवारांनी त्याला नकार दिला. असा दावा करण्यात आला आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडुन यावर कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही पण यामुळे महाविकास आघाडीच्या एकजुटीला तडा गेल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता या शरद पवारांवरील टीकेवर आणि राष्ट्रवादी फोडण्याच्या गौप्यस्फोटावर राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया येते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर परखड शब्दात टिका केली होती. त्यावेळी ठाकरे सामनातुन याला उत्तर देतील असे सांगण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून आजच्या सामनातून पवारांवर टीका केली? असे बोलले जात आहे.

आपल्याला काय वाटतं?

Your email address will not be published.

Don`t copy text!